पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिवपदी कु.साहिल आग्रे याची निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिवपदी कु.साहिल आग्रे याची निवड

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाच्या सचिवपदी तृतीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थी कु. साहिल आग्रे याची सर्वानुमते निवड करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी महाविद्यालय विद्यार्थी मंडळाची नियुक्ती मुंबई विद्यापिठाच्या याआधीच्या परिपत्रकानुसार करण्यात आली. या विद्यार्थी मंडळात गतवर्षी गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व महाविद्यालयात नियमित उपस्थित राहून सर्व उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थ्यांना विविध वर्गाच्या प्रमुखपदी तसेच विभागप्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्यानुसार प्रथम वर्ष कला वर्गप्रतिनिधी रोहीलकर वसुंधरा विलास, प्रथम वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी बेटके प्रणय प्रमोद, द्वितीय वर्ष कला वर्गप्रतिनिधी भुवड समीक्षा रमेश , द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी साल्हे सामिया मुस्तफा, तृतीय वर्ष कला वर्गप्रतिनिधी कुलकर्णी आदिती अभिजित, तृतीय वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी साळवी दिक्षा ज्ञानेश्वर यांची निवड केली गेली. महाविद्यालयातील क्रीडा विभाग विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. खोचाडे निखील रवींद्र , एनएसएस विभाग प्रतिनिधी म्हणून कु. आग्रे साहिल दिलीप, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी म्हणून कु. पाष्टे रणजित यांची नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य प्रतिनिधी म्हणून तृतीय वर्ष कला वर्गातील वेद्रे तन्वी अनिल तर तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील भेकरे ऋतुजा दिलीप यांची नियुक्ती करण्यात आली. कु.साहिल आग्रे याने विद्यार्थी मंडळ प्रतिनिधी होण्याची इच्छा व्यक्त केली असता अदिती कुलकर्णी हिने त्याच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि रोहीलकर वसुंधरा हिने सर्वानुमते त्याला अनुमोदन दिल्यावर प्राचार्य डॉ. देसाई यांनी कु. आग्रे साहिल याची विद्यार्थी मंडळ सचिवपदी नियुक्ती झाल्याचे जाहिल केले. महाविद्यालय विकासात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन करताना सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतील यासाठी विद्यार्थी मंडळाने प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी विद्यार्थी मंडळाच्या सचिव तसेच सर्व विद्यार्थी प्रतिनिधीना दिल्या. यासर्व प्रक्रियेत महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता प्रमुख प्रा. लंकेश गजभिये, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, डॉ. दिनेश पारखे आणि डॉ. जालिंदर जाधव सहभागी झाले होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात