“बळीरासेना”पक्ष प्रमुख अशोक वालम कोकण दौऱ्यावर
आबलोली (संदेश कदम )
बळीराज सेना पक्ष प्रमुख आणि राष्ट्रय अध्यक्ष अशोक वालम यांचा कोकण दौरा दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. कोकणात गेले पाच महिने पाऊस पडत असून, कोकणातील शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. या वाढीव पावसात भात शेती, नाचणी, कुळीथ, उडीद अशी कोकणातील इतरही पिके यांचं फार नुकसान झाल आहे. आंब्या काजूचे पीक तर यावर्षी आलेच तर एक दीड महिना उशिरा येईल. अशा वातावरणात त्याचाही काय भरोसा राहिलेला नाही आणि अशातच हे सरकार व कोकणातील आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री यांना अजिबात कोकणातील शेतकऱ्यां बाबतीत कुठलीच काळजी नसल्याचे दिसत आहे.
या दौऱ्यात कोकणातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून शेती नुकसानाची प्रत्यक्ष माहिती घेऊन ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी म्हणून बैठक घेऊन कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. वेळेला आंदोलन घ्यावे लागले तरीही तशी तयारी करण्यात आली आहे अशी माहिती अशोक वालम यांनी दिली.
तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या
















