आरजीपीपीएल कंपनीमध्ये ५१ व्या एन.टी.पी.सी. स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम संपन्न

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी कंपनीमध्ये ५१ व्या एन.टी.पी.सी. स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम संपन्न झाले. यावेळी आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल देसाई यांच्या शुभहस्ते एन.टी.पी.सी.चा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल देसाई यांनी अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्गाला संबोधित करताना आणि त्यांनी आपले विचार आणि दृष्टिकोन मांडला.याप्रसंगी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापण्याचा समारंभ संपन्न झाला. या एनटीपीसी स्थापना देवाच्या निमित्ताने वृक्षारोपण मोहीम देखील आयोजित करण्यात आली होती, जी एनटीपीसीच्या गेल्या काही वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे प्रतीक आहे आणि ऊर्जा क्षेत्रातील शाश्वतता, उत्कृष्टता आणि वाढीसाठी सामूहिक वचनबद्धतेची पुष्टी करते. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल देसाई, एजीएम. ओ अँड एम आनंद मलाक,एचआर.एजीएम. स्नेहाशीष भट्टाचार्य,सीएफओ
राजेश नंदकर , सीआयएसएफचे असिस्टंट कमांडर सोनू शर्मा, बालभारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य
सुरजीत चटर्जी, यूपीएल चे इन्चार्ज
नितिन खानविलकर, एच आर मॅनेजर अमित शर्मा, एच आर मॅनेजर श्रीमती गुंजन शर्मा तसेच सर्व आरजीपीपीएल कंपनीतील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी व कामगार वर्ग उपस्थित होते.















