“२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय”; वादावर रविंद्र चव्हाणांचे संकेत, महायुतीत नवे समीकरणे?

👉 “२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय”; वादावर रविंद्र चव्हाणांचे संकेत, महायुतीत नवे समीकरणे?

जळगाव दौऱ्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उडवाउडवी; निलेश राणेंच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले, शिवसेना-भाजप संबंधांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

बातमी :
जळगाव :- “मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. यानंतरच मी उत्तरे देईन,” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी करताच राज्यातील महायुतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. महायुतीत मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत असताना चव्हाण यांचे हे मर्यादित पण संकेतपूर्ण वक्तव्य अनेक शक्यता व्यक्त करत आहे.

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावरून राज्यात महायुतीत मोठी कुस्ती सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना दुय्यम ठरवत पक्षप्रवेशाचे कार्यक्रम घेतल्याने शिंदे गोटात चांगलीच खळबळ माजली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातच हे हालचाली झाल्याने वाद अधिक चिघळला. या घडामोडींची तक्रार उपमुख्यमंत्र्यांकडून दिल्लीपर्यंत पोहोचली, तरीही त्याचा काही परिणाम दिसून आला नाही.

दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये धाड टाकून भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी पैशांच्या थप्प्या असलेली पिशवी पकडल्याचा दावा केला. या पैशांचा संबंध रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याशी असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. त्यामुळे मालवणसह राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जळगाव दौऱ्यावर आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्षांना माध्यमांनी याच आरोपांवरून प्रश्न विचारले असता त्यांनी सुरुवातीला काढता पाय घेतला. मात्र, नंतर कारची काच खाली करत त्यांनी, “मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, त्यानंतर मी यावर उत्तरे देईन,” असे स्पष्ट केले. त्यामुळे २ तारखेचा नेमका संदर्भ काय, त्या दिवशी काय घडणार, याबाबतची राजकीय उत्सुकता अधिक वाढली आहे.

शिवसेना आमदार निलेश राणे यांचा आरोप, शिंदे-फडणवीस एका कार्यक्रमात एकमेकांपासून दूर उभे राहिल्याचे व्हिडीओ, महायुतीतील अंतर्गत नाराजी अशा पार्श्वभूमीवर चव्हाणांचे वक्तव्य हे नवे राजकीय संकेत मानले जात आहेत. राज्यात शिवसेना-भाजप संबंध खरोखरच तणावपूर्ण टप्प्यात आहेत का, की हे सर्व पुढील राजकीय डावपेचांचा भाग आहे, याबाबत आता चर्चांना ऊत आला आहे.

 


हॅशटॅग 
#रविंद्रचव्हाण #महायुतीराजकारण #भाजप #शिवसेना #निलेशराणे #जळगावदौरा #महाराष्ट्रराजकारण #युतीतणाव #MalvanPolitics #MahaYutiDrama

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें