मतदान ऐवजी अन्नदान करावे. वाढदिवस साजरा करताना. अनाथ आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना अन्नदान करावे .  बगाडे पाटील पत्रकार

मतदान ऐवजी अन्नदान करावे.
वाढदिवस साजरा करताना. अनाथ आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना अन्नदान करावे .
बगाडे पाटील पत्रकार

अन्नदानातून वाढदिवस साजरा करण्याचे नंदकुमार बगाडे यांचे आवाहन

श्रीरामपूर प्रतिनिधी

श्रीरामपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व भीमशक्तीचे श्रीरामपूर शहराध्यक्ष अंबादास निकाळजे यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी तालुका व शहरातील कार्यकर्त्यांनी हार, पुष्पगुच्छ देऊन निकाळजे यांचा सत्कार केला. महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समिती, अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील यांनी मार्गदर्शन करताना वाढदिवस साजरा करण्याचा वेगळा आणि समाजाभिमुख आदर्श मांडला.

 

ते म्हणाले की,

 

> “सामाजिक कार्यकर्ते आणि पुढारी यांनी वाढदिवस, कार्यक्रम साजरे करताना मोठमोठे डीजे लावण्यापेक्षा अनाथ आश्रमातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, आळंदी येथील आश्रमातील शालेय विद्यार्थी तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांना अन्नदान करावे. तेव्हाच वाढदिवस साजरा करण्‍याला खरी अर्थपूर्णता येईल.”

 

 

 

तसेच त्यांनी पुढे सांगितले की, संत-महात्म्यांचे तसेच महान पुरुषांचे विचार, आचारधर्म आजच्या युवा पिढीने जोपासणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आई-वडील आणि सासू-सासरे यांच्या त्याग, कष्ट व संस्कारांपासूनही आदर्श घ्यावा आणि त्यांच्या आचार-विचारांचे पालन करावे, तरच आपला वाढदिवस साजरा खऱ्या अर्थाने सार्थक होईल.

 

बगाडे पुढे म्हणाले की, वाढदिवस साजरा करताना वृक्षारोपण, अन्नदान, गोरगरीब व वंचित विद्यार्थी-विद्यार्थ्यांना कपडे, वह्या, पेन वाटप अशा उपक्रमांचे आयोजन झाले पाहिजे. अशा प्रकारचे वाढदिवस झाले तर समाजामध्ये सुसंस्कृत आणि आदर्श कार्यक्रमांचा पायंडा पडेल. यासाठी युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 

अंबादास निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त चांगले उपक्रम राबवत समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीरामपूर तालुका व शहरातून अनेक युवक सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाला उद्योजक सुनील भालके, आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष करण ससाने, जाधव साहेब, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर, संपादिका विजयाताई बोरसे, दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य पोपटराव पठारे, पोपटराव बागुल आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांनी निकाळजे यांचा शाल, श्रीफळ, गुच्छ व हार देऊन सत्कार केला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास निकाळजे मित्र मंडळ, श्रीरामपूर यांनी केले.

यावेळी अन्नदानाचा कार्यक्रमही पार पडला असून, त्याची व्यवस्था भगिनी वर्गाने केली होती.

शेवटी आभारप्रदर्शन अंबादास निकाळजे यांनी मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें