रत्नागिरी तालुक्यात लोकशाहीचा बोजवारा वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत तहकूब ग्रामसभेलाही लोकप्रतिनिधी, लोकसेवक बेपत्ता

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी तालुक्यात लोकशाहीचा बोजवारा

वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत तहकूब ग्रामसभेलाही लोकप्रतिनिधी, लोकसेवक बेपत्ता

रत्नागिरी:- श्री निलेश रहाटे

रत्नागिरी तालुक्यातील वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत “आमचा गाव – आमचा विकास आराखडा 2026/27 तयार करण्यासाठी कोरमअभावी तहकूब झालेली ग्रामसभा दि 30/12/25 ला पुन्हा आयोजित करण्यात आली होती. मात्र या ग्रामसभेत लोकशाही व्यवस्थेची अक्षरशः खिल्ली उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
४ हजार लोकसंख्या असलेल्या गावात अवघे फक्त ६ ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष मनजे सरपंच, उपसरपंच तसेच एकही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित नव्हते.

पूर्वीच इशारा देऊनही प्रशासन ढिम्म या प्रकाराची गंभीरता ह्यापूर्वी ओळखून तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते निलेश रहाटे यांनी यापूर्वीच ग्रामसभेला
शासकीय व निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, महावितरण अधिकारी, गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील
यांना अधिकृत ग्रामसभा नोटीस देऊन ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी लेखी अर्ज सादर करावा व आवर्जून त्याना उपस्थिती राहण्यासाठी सांगावे असे पत्र सुद्धा सरपंच हयांना देण्यात आले होते.
मात्र तरीही संबंधित अधिकारी व कर्मचारी ग्रामसभेला हजर न राहिल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार ग्रामसभेला उपस्थित राहणे हे सरपंच,उपसरपंच, सदस्य तसेच संबंधित अधिकारी चे कर्तव्य आहे.
तहकूब ग्रामसभेलाही जाणीवपूर्वक गैरहजर राहणे म्हणजे कर्तव्यातील गंभीर कसूर असून त्यावर कारवाईची तरतूद कायद्यात आहे.

गावाच्या विकासाचा आराखडा ठरवणारी ग्रामसभा जर लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांनाच महत्त्वाची वाटत नसेल तर — “आमचा गाव – आमचा विकास” आराखडा फक्त कागदोपत्रीच राहणार का?

या संपूर्ण प्रकाराबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. दोषी लोकप्रतिनिधी अनुपस्थित मूळे शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
गावात तीव्र नाराजी, संताप व अविश्वासाचे वातावरण पसरले आहे.

“ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा पाया आहे. पण इथे लोकप्रतिनिधी लोकसेवक च गैरहजर असतील तर विकास कसा होणार?” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली व ग्रामसभेचा अजिठा ही पूर्ण गावात फिरत नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. तक्रारी नंतर प्रशासन कारवाई करणार की वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीतील हा लोकशाहीचा अपमान दुर्लक्षित करणार?
संपूर्ण गावाचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला