चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोलीची विद्यार्थिनी कु .पद्मश्री प्रसन्ना वैद्य हिला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार प्राप्त

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोलीची विद्यार्थिनी कु .पद्मश्री प्रसन्ना वैद्य हिला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार प्राप्त

आबलोली (संदेश कदम)

‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारने गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. पद्मश्री प्रसन्ना वैद्य हिला सन्मानित करण्यात आले . कोकणातील बहुपैलू विद्यार्थ्यांचा जाहीर गौरव करणारा, विद्यार्थीप्रिय सन्मान म्हणजे गोडबोले पुरस्कार हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० :०० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे आयोजित करण्यात आला होता .

चतुरंग प्रतिष्ठानचा ‘सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार’ निवृत्त मेजर जनरल मान. श्री. शिशिर महाजन यांच्या हस्ते कु. पद्मश्री ला देण्यात आला . यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रीय कीर्तनकार आणि व्याख्याते मान. डॉ. चारुदत्त आफळे, मान. डॉ. मिलिंद गोखले, मान. प्रा. वैभव कानिटकर,यासह अनेक मान्यवर , प्रतिष्ठीत नागरिक , विविध शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक , शिक्षक , पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

शनि-रवि. दि. १३-१४ डिसेंबर रोजी ५९ कोकण शाळांतील एकूण २४५ विद्यार्थ्यांचे ग्रुप इंटरव्ह्यू पार पडले. या विद्यार्थ्यांमधून ३६ शाळांतील ३६ विद्यार्थ्यांची निवड सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या मुलाखतीसाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून भगीरथ संस्थेचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद गोखले आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वैभव कानिटकर यांनी काम पाहिले.

सदर पुरस्कार वितरण सोहळा. सन्मान चिन्ह , प्रशस्तीपत्र ,पाचशे रुपये किमतीची पुस्तके , रोख रू . १००० असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . अतिशय समंजस ,प्रामाणिक , स्पष्टवक्ती असणाऱ्या पद्मश्रीला भविष्यात डिझायनिंग शाखेचे शिक्षण घेऊन स्टुडिओ काढण्याचा मानस आहे . बुद्धिबळ खेळणे , चित्रकला , हस्तकला अश्या आवडी जोपासणारी पद्मश्री स्वामी विवेकानंद यांना आपले आदर्श मानते .पद्मश्रीने जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, कराटे स्पर्धा , ज्युडो स्पर्धा , यांसारख्या विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवले आहे .

पद्मश्रीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे सर्वत्र कौतुक होते आहे . पद्मश्रीला तिच्या प्रशालेतील सर्व गुरुवर्य व तिच्या पालकांचे तिला उत्तम मार्गदर्शन लाभल्याचे तिने आपल्या भाषणामध्ये आवर्जून सांगितले . गोडबोले पुरस्कार मिळवायचा असा संकल्प तिने लहानपणी केला असल्याबाबतहि आपल्या भाषणात तिने सांगताना आपणा सर्वांचे आशीर्वादाने तो संकल्प पूर्ण होत असल्याची कबुली देऊन. मी चतुरंग प्रतिष्ठानचे कायम ऋणी राहणार असे तीनेआवर्जून यावेळी सांगितले

लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाईत, कार्याध्यक्ष सचिन बाईत, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश कदम ,सचिव राकेश साळवी तसेच सर्व संस्थाचालक व मुख्याध्यापक डी .डी .गिरी आणि सर्व गुरुजन वर्ग यांनी पद्मश्रीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात