ईडी कडून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष मुक्त! मोठा दिलासा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ईडी कडून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष मुक्त! मोठा दिलासा

मुंबई ~महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

याआधीच या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) भुजबळ यांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीनेही त्यांचा निर्दोष मुक्ततेचा अर्ज मंजूर केला आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारत बांधकामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या कथित घोटाळ्याची रक्कम सुमारे ८५० कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात भुजबळ यांच्यासह एकूण १४ जणांवर आरोप होते.

आरोपांमुळे छगन भुजबळ यांना तब्बल दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र सखोल चौकशीनंतर प्रथम एसीबी आणि आता ईडीनेही त्यांना या प्रकरणातून पूर्णपणे दोषमुक्त केले आहे.

ईडीकडे भुजबळ व अन्य आरोपींकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. तो अर्ज मंजूर झाल्याने आता भुजबळ यांच्यावरील सर्व आरोपांवर पूर्णविराम मिळाला आहे.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]