गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

 


गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन

गुहागर 🙁सुजित सुर्वे)
गुहागर तालुक्यात येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना, मनसे व मित्र पक्षांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सचिव भुषण संजय पवार यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले की, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, गुहागर तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे मतदार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी युतीच्या उमेदवारांना जबाबदारीपूर्वक सहकार्य करावे.

जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणात उभे असलेले उद्धव ठाकरे शिवसेना, मनसे व मित्र पक्षांचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या निर्णयामुळे गुहागर तालुक्यातील निवडणूक समीकरणांना वेगळी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें