रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* –  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ कोणतेही संविधानिक पद नसलेल्यानी हा अपप्रचार करू 

■ समिर विजय शिरवडकर- रत्नागिरी

राजापूर :- ( कातळी) :- शिवसेना भाजप आणि मित्र पक्ष ( महायुती) उमेदवारांचा प्रचारात कातळी गट मधील जिल्हा परिषद कातळी उमेदवार सोनाली वसंत टुकरूल,कातळी पंचायत समिती उमेदवार पंढरी मयेकर, तर अणसुरे पंचायत समिती उमेदवार जानव्ही गावकर यांच्या प्रचार सभेसाठी राजापूर-लांजा-साखरपा चे आमदार सन्मा.किरण ( भैय्या ) सामंत हे कातळी कात्रादेवी वाडी मध्ये आलें होते, त्यावेळी रिफायनरी विषयावर बोलताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
या सभेला संबोधित करताना, रिफायनरी हा विषय मी आमदार होण्या आधिच संपला आहे,यासाठी मुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत आणि स्वतः मी पुढाकार घेऊन हा विषय कधीच संपवला आहे.रिफायनरी ची अधिसूचनेची होळी करणाऱ्यानी पुन्हा रिफायनरी होणार ह्या अपप्रचाराचे दुकान बंद करावे,आणि कोणतेही संविधानिक पद नसतांना आणि निवडणूक आली की दुकानदारी चालू करण्याऱ्यानी भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक करून मतांची चोरी करणाऱ्या अश्या या मंडळींना कायमस्वरूपी घरी बसवा असे जाहीर आवाहन केले.या विभागात कोणतेही प्रदूषण कारी प्रकल्प येणार नाहीत,मात्र पर्यावरण पूरक प्रकल्प येत्या काही महिन्यात आपल्याला डोळ्या देखत दिसतील. गावतील पन्नास टक्के बंद असलेल्या घरातील तरुणांना रोजगार देऊन गावतील शंभर टक्के घरे उघडणार असा शब्द दिला.
यावेळी, विध्या राणे,शशिकांत सुतार,रवी नागरेकर, राजा काजवे,उमेदवार सोनाली ताई टूकरूल यांनी आपले विचार मांडले. आणि येणाऱ्या ७ फेब्रुवारी २६ रोजी धनुष्यबाण चिन्हां समोरील बटन दाबून तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे उपस्थितीताना आवाहन केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें