तळवलीचे आधारस्तंभ, शिक्षणप्रेमी कै. रत्नाकर आंग्रे यांचे दुःखद निधन
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
गुहागर तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते
आधारस्तंभ कै. श्री. रत्नाकर आंग्रे काका यांचे दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता डोंबिवली येथे दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने तळवली गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
कै. आंग्रे यांनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक मंडळांवर महत्त्वाची पदे भूषवली. शिक्षण क्षेत्राबद्दल त्यांना विशेष आस्था होती. तळवली हायस्कूलच्या प्रगतीसाठी त्यांनी नेहमीच मोलाचे योगदान दिले. गावच्या विकासासाठी ते कायम तत्पर असत.
रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने संवाद साधणे, सर्वांची आस्थेने खुशाली विचारणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी आयुष्यभर माणसेच जोडली.
त्यांच्या जाण्याने एक कुशल, कार्यशील, शिक्षणप्रेमी आणि समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांची उणीव कधीही भरून निघणार नाही.











