देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्लान, भाजपमधून विनोद  तावडेंना पुढे आणलं जातंय” – सुषमा अंधारे

Maharashtra Politics : “देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्लान, भाजपमधून विनोद  तावडेंना पुढे आणलं जातंय” सुषमा अंधारे.

लातूर -देवेंद्र फडणवीस यांना सध्या वेटिंगवर ठेवलं जात असून त्यांना राज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी भाजपाच सक्रिय झाली आहे, असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. दिल्लीत एका तासात नवनीत राणा यांना भेट मिळते आणि फडणवीसांना वेटिंग वर ठेवलं जातं. भाजपातलेच काही लोक फडणवीसांना संपवण्यासाठी नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांचं नाव समोर आणत आहेत, असंही अंधारे म्हणाल्या. त्यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

द रम्यान, सुषमा अंधारे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना मोठं विधान केलं. फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी भाजपाच सक्रिय झाली आहे. दिल्लीत एका तासात नवनीत राणा यांना भेट मिळते, पण फडणवीसांना वेटिंग वर ठेवलं जातं. भाजपातलेच काही लोक नितीन गडकरी आणि तावडे यांचं नाव समोर आणत आहेत”.

राज्याच्या राजकारणात आता देवेंद्र फडणवीस यांनी वाढवलेला भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवील की काय ही परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांना ज्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं, तेच शिंदे आता फडणवीसांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यासाठी अनेक कृत्या चालू आहेत हे बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात येत आहे, असं वक्तव्य देखील सुषमा अंधारे यांनी केलं.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें