पाटपन्हाळे विद्यालयात स्वच्छता अभियानांतर्गत कार्यक्रम संपन्न..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

छाया- संदेश कदम

पाटपन्हाळे विद्यालयात स्वच्छता अभियानांतर्गत कार्यक्रम संपन्न..!

पं.स.गुहागर , ग्रा.पं.पाटपन्हाळे व पाटपन्हाळे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता सेवा उपक्रम..!

आबलोली (संदेश कदम)

पंचायत समिती गुहागर , ग्रामपंचायत पाटपन्हाळे व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे यांच्या संयुक्त विद्यमाने ” स्वच्छता ही सेवा ” या उपक्रमांतर्गत जनजागृती प्रभात फेरी , स्वच्छता दौड व पाटपन्हाळे विद्यालयातर्फे स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य तसेच वृक्ष वाटप यांसारखे उपक्रम नुकतेच सादर करण्यात आले.
‌‌ स्वच्छता उपक्रमासाठी उपस्थित असलेले अधिकारीवर्ग मान्यवर व कर्मचारी यांचे पाटपन्हाळे विद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले. स्वभाव स्वच्छता , संस्कार स्वच्छता उपक्रमांतर्गत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पाटपन्हाळे विद्यालय , पंचायत समिती गुहागर , ग्रामपंचायत पाटपन्हाळेतर्फे शृंगारतळी बाजारपेठेत विद्यार्थी , अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता संदेशांच्या घोषणांनी जनजागृती फेरी सादर केली. पाटपन्हाळे हायस्कूलच्या मैदानावर भारत देशाचा नकाशा रेखाटून त्या नकाशावर विद्यार्थी उभे राहून स्वच्छता दौड सादर करण्यात आले .तसेच पाटपन्हाळे विद्यालयातर्फे स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थी , उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी दौड स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेसाठी ग्रामपंचायत पाटपन्हाळेतर्फे रोख रक्कम व सुपारीचे झाड बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आले. विद्यार्थी दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक – प्रणय दिनेश मुकनाक – बारावी कला , द्वितीय क्रमांक – राज संदीप काजारे – अकरावी वाणिज्य , तृतीय क्रमांक – वेदांत किशोर अडूरकर – अकरावी वाणिज्य तसेच विद्यार्थिनी दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक – पूनम संजय मोहिते – वाणिज्य शाखा , द्वितीय क्रमांक धनश्री परशुराम शिगवण – अकरावी विज्ञान व तृतीय क्रमांक – भाविक सचिन रावणंग – बारावी वाणिज्य यांनी संपादित केले . तसेच अधिकारी , कर्मचारी व शिक्षक दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक – महेंद्र भुवड , द्वितीय क्रमांक – सुधीर वासनिक व तृतीय क्रमांक – सुमंत भिडे यांनी पटकावला. स्वच्छता उपक्रमांतर्गत राबवलेल्या कार्यक्रमासाठी पंचायत समिती गुहागरचे विस्तारअधिकारी श्री.भांड , गटशिक्षणाधिकारी श्री.गळवे , पाटपन्हाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच असीम साल्हे , ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. सुलभा बडद तसेच मान्यवर म्हणून श्याम साळवी , मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , ग्रामसेवक व तलाठी तसेच पाटपन्हाळे ग्रामपंचायतचे कर्मचारी , पाटपन्हाळे हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ” स्वभाव स्वच्छता , संस्कार स्वच्छता ” उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या स्पर्धेसाठी “झाडे लावा , झाडे जगवा ” तसेच “स्वच्छता राखा , स्वच्छता पाळा , आरोग्य जपा ” या संदेशात्मक उपक्रमासाठी अधिकारीवर्ग , मान्यवर , विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी धन्यवाद मानून उपक्रमाचा समारोप केला.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam