देवरुख येथे बचत गटातील महिलांचा स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

देवरुख येथे बचत गटातील महिलांचा स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न..!

राधाकृष्ण गोविंद फाउंडेशन चिपळूण – सावर्डे यांचा स्तुत्य उपक्रम..!

आबलोली (संदेश कदम)…

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील श्री.महालक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय देवरुख येथे राधाकृष्ण गोविंद फाउंडेशन चिपळूण – सावर्डे यांचे संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांना स्वत: च्या पायावर ऊभे राहण्यासाठी आणि आर्थिक सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी संगमेश्वर तालुक्यातील ३५ गावातील बचतगटाच्या १४० महिला उपस्थित होत्या. या स्तुत्य उपक्रमाचे नीटनेटके नियोजन राधाकृष्ण गोविंद फाउंडेशन चिपळूण- सावर्डे यांचे वतीने करण्यात आले होते यावेळी राधाकृष्ण गोविंद फाउंडेशन चिपळूण – सावर्डे या फाउंडेशनच्या प्रमुख सौ. सई निकम मॅडम यांनी फाउंडेशनच्या आतापर्यंतच्या राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा आढावा घेत फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे घेऊन महिलांना स्वत:चा व्यवसाय ऊभा कसा करता येईल या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले

या मार्गदर्शन मेळाव्याला ऍड.सिमा गिडये यांनी महिलांच्या सुरक्षा विषयी शासनाने केलेला कायदा याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर देवरुख येथील SBI बॅंकेचे मॅनेजर श्री. निखिल भिडे यांनी मार्गदर्शन करताना SBI बॅंकेच्या देवरुख येथील शाखेतून गेल्या ६ महिण्यात ६ कोटी रुपये बचत गटांना कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती दिली.यानंतर संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. भरत चौगुले यांनी मौलिक मार्गदर्शन करताना संगमेश्वर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या माद्यमातून राबविण्यात येणाऱ्या १) माझी लाडकी बहिण योजना, २) मुख्यमंत्री युवा कार्य योजना, ३) लेक लाडकी योजना, ४) प्रधानमंत्री सुरक्षा / मातृ वंदना योजना, ५) सर्व प्रवर्गातील मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र योजना, ६)प्रधानमंत्री आवास योजना,७) रमाई आवास योजना आदी. योजनांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

   त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरीचे उद्योग निरिक्षक श्री. रविंद्र सुर्यवंशी यांनी जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती (सीएमईजीपी) या योजने विषयी मौलिक मार्गदर्शन करताना या योजनेची पात्रता आणि निकष समजावून सांगून सभागृहातील महिलांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. तसेच उद्योग निरिक्षक कु. अर्चना सकपाळ यांनीहि मौलिक मार्गदर्शन केले.यानंतर प्रमुख मार्गदर्शक खादी महामंडळाचे निवृत्त अधिकारी श्री.गुरुनाथ मोहित यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या उद्योग संधी कोणत्या आहेत या विषयी महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी या मार्गदर्शन मेळाव्याला संगमेश्वर तालुक्यातील एकुण ३५ गावातील बचतगटाच्या १४० महिला उपस्थित होत्या या उपस्थित महिलांमधून १०/१२ फॉर्म भरून घेण्यात आले.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय

हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय

हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६...
Read More
हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय

तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

तवसाळ येथील 'नवसाला पावणारी' श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा तवसाळ (प्रतिनिधी- सुजित सुर्वे): रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?
Play sound