श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल ॲकॅडमीच्या प्रांगणात ‘ग्रॅण्डपॅरेंट्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल ॲकॅडमीच्या प्रांगणात ‘ग्रॅण्डपॅरेंट्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा…

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्रीमती तारामाई वर्तक मेमोरिअल ॲकॅडमीच्या प्रांगणात आगाशी – विरार – अर्नाळा शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष विकास नरसिंह वर्तक ह्यांच्या संकल्पनेने “ग्रॅण्डपॅरेंट्स डे” मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सध्याच्या तंत्रज्ञान व व्यस्त युगात पालक मुलांसाठी संपूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. अशा वेळी आजी-आजोबा ही भूमिका चोख बजावतात. मुलांना संस्कार देतात. नातवंडांना जीवनाचे महत्त्व शिकवतात. असे घराचे आधारस्तंभ असलेल्या, थोर व्यक्तिमत्व असलेल्या आजी-आजोबांचा सन्मान झालाच पाहिजे ह्याचे बाळकडू शालेय वयापासून देणे गरजेचे आहे. ह्याच संस्कारासाठी आवारात प्रथमच ग्रॅण्डपॅरेंट्स डे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

 

सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष विकास वर्तक आणि पल्लवी वर्तक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘ग्रॅण्डपॅरेंट्स डे’ चे महत्त्व सांगत शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात बालवाडी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत व भाषणे सादर करून आपले आजी-आजोबांवरचे प्रेम व्यक्त केले. शिक्षकवृदांनी आजी-आजोबांसाठी नाटिका व गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

 

शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना कोळवणकर यांनी आपल्या जीवनात असणारे आजी-आजोबांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माध्यमिक विभागाच्या प्राचार्य रचना शर्मा यासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीतील विद्यार्थी स्वरूप गायकवाड व आरोही चान्सीकर ह्यांनी केले.

 

सदर कार्यक्रमास संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम बहारदार झाला आणि नातवंडे व आजी-आजोबा आनंदी झाले.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त

वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त प्रतिनिधी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद गावात दि. 1...
Read More
वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त

समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन...
Read More
समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात