भयंकर! पलटी झालेल्या टँकरमधील पेट्रोल चोरण्यासाठी लोकांची गर्दी झाली असतानाच मोठा स्फोट! १०० हून अधिक जणांचा मृत्यू!!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भयंकर! पलटी झालेल्या टँकरमधील पेट्रोल चोरण्यासाठी लोकांची गर्दी झाली असतानाच मोठा स्फोट! १०० हून अधिक जणांचा मृत्यू!!.

व्हायरल पोस्ट..

नायजेरियामधून एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन झालेल्या भीषण स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाला असून ५० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नायजेरियामधील जिगावा राज्यात ही घटना घडली. येथे एक पेट्रोल टँकर पलटला. टँकर पलटल्यानंतर पेट्रोलची गळती शुरू झाल्याने मोठ्या संख्येने लोक पेट्रोल घेण्यासाठी टँकरच्या जवळ जमा झाले. मात्र अचानक टँकरचा स्फोट झाला. या स्फोटात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, पेट्रोल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यानंतर पेट्रोल चोरण्यासाठी लोक टँकरकडे धावले. त्याचवेळी टँकरचा स्फोट झाला. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. सांगितले जात आहे की, टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटले. त्यानंतर त्यातून तेल गळती सुरू झाली. स्फोट झाला त्यावेळी लोक टँकरमधून पेट्रोल चोरत होते.

पोलिसांनी सांगितले की, पेट्रोलच्या गळतीमुळे टँकरचा स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण टँकर आगीत भस्मसात झाले. या दुर्घटनेत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जिगावा राज्य आपत्तकालीन व्यवस्थापन एजन्सीचे प्रमुख डॉ हारुना मॅरिगा यांनी सांगितले की, ९७ लोकांचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. तर आठ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

पोलिस प्रवक्ते लावन अॅडम यांनी सांगितले की, विद्यापीठाजवळील महामार्गावरून जात असताना टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जिगावा राज्यात मध्यरात्री हा स्फोट झाला. जेव्हा स्फोट झाला तेव्हा रहिवासी उलटलेल्या टँकरमधून इंधन घेत होते, ज्यामुळे भीषण आग लागली आणि १०० हून अदिक लोक जागीच ठार झाले.

या भयंकर अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताची भीषणता दिसत आहे. अपघातानंतर संपूर्ण परिसरात मोठी आग दिसत आहे. घटनास्थळी मृतदेह विखुरलेले दिसून येत असून अनेक मृतदेह पूर्णपणे जळून कोळसा झालेले आहेत. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा

जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा   रत्नागिरी, ता. १३ : राज्य सरकारने जमीन महसूल...
Read More
जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा

तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर

तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर शहरी मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने; ११६ नगरपालिका आणि ७ महानगरपालिकांमध्ये...
Read More
तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय

हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय

हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६...
Read More
हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय

तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

तवसाळ येथील 'नवसाला पावणारी' श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा तवसाळ (प्रतिनिधी- सुजित सुर्वे): रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित
Play sound