उमेदवारी बाबत “वेट अँड वाच” वर असणारी गुहागर विधानसभा मतदारसंघातील भाजपा एकवटली.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर विधानसभा भाजपा वेट अँड वॉच वर

कोकणचे पालक सा. बां.मंत्री सन्मा.नाम.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासमोर ठेवला विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा

शृगरतळी ( मयुरेश भागवत) -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा रंगत चाललेली असतानाच कोकणचे पालक सा. बा.मंत्री नाम. सन्मा.रविंद्रजी चव्हाण साहेब यांनी काल पुर्ण रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी बरोबर संवाद साधला असता गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुती लढणार असून महायुतीचाच विजय होणार आहे असे संकेत दिले असल्यामुळे पुन्हा गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपा वेट अँड वॉच भूमिकेत आहे. मात्र पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते हे गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपाने लढवण्यासाठी आग्रही आहेत.

शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात अडीच वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गुहागर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने लढावा आणि महायुतीतून तो विजयी व्हावा अशा प्रकारच्या सूचना भारतीय जनता पार्टीच्या शिरस्त नेतृत्वाने गुहागर मध्ये येऊन दिल्याने येथील मागील अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि वेगाने भाजपाच्या कामाला लागले होते. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वात महायुतीच्या विजयाचे वातावरण या मतदारसंघात निर्माण झाले आहे. असे असताना आजपर्यंत महायुतीतून गुहागर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला याबाबत गुप्तता पाळण्यात आली असल्याने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे थोडे चल बिचल झालेले असताना या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कायमस्वरूपी बळ देणारे कोकणचे पालक आणि राज्याचे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच रत्नागिरी येथे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र यावेळी ही चव्हाण साहेबांनी ही सीट महायुती लढणार आणि जिंकणार असेच सांगितले.त्यामुळे पुन्हा गुहागर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी वेट आणि वॉचवरच राहिली आहे. मात्र यामुळे महायुतीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्ष या विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीतुन नेतृत्व करणारे नातू घराण्यातील स्वर्गीय तात्या, विनयशील नेतृत्व विनयजी नातू आणि स्वर्गीय आमदार रामभाऊ बेंडल यांचे पुत्र, माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीच्या विशेष सहकार्याने गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले राजेश बेंडल यांनी पालकमंत्री सन्मा. नाम. उदयजी सामंत यांच्यामार्फत नुकताच केलेला शिवसेना प्रवेश यामुळे गुहागर विधानसभेतील उमेदवारी बाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. येथील भारतीय जनता पार्टी मात्र ही जागा भारतीय जनता पार्टीच्याच पारड्यात पडणार यावर ठाम आहे. मागील २ वर्षात भाजपाने या गुहागर विधानसभेतील सर्व मतदान केंद्रांवरती केलेलं काम, कार्यकर्त्यांना दिलेल बळ, त्यांच्या तना आणि मनात संचरवलेला उत्साह यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात येथे महायुती 100% विजय होऊ शकते याची खात्री येथील भाजप पदाधिकाऱ्यांना आहे. मात्र जर यावेळी पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात ५ विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि कमळ निशाणीला नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही तर मात्र याचे दूरगामी परिणाम या जिल्ह्यात निवडणुकांवर होतील, भारतीय जनता पार्टीच्या प्रचार आणि प्रसारावरती पण होतील अशी चर्चा पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात रंगू लागली आहे.

Plz Join whatsup group ????

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam