समर्थकांच्या जल्लोषात भास्करराव जाधव यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समर्थकांच्या जल्लोषात भास्करराव जाधव यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल..

जनतेचा आणि माझा एकमेकांवरील विश्वास सार्थ ठरतोय – आम. भास्करशेठ जाधव

आबलोली (संदेश कदम) …

गेली अनेक वर्षे मी आमदार आहे. तरी माझ्यात कधी बदल झाला नाही. माझे पाय जमिनीवर राहीले आहेत. मला अहंकार गर्व नाही. इथल्या जनतेचा आणि माझा एकमेकांवरील विश्वास सार्थ ठरतोय असे स्पष्ट प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे विद्यमान आमदार भास्करशेठ जाधव यांनी केले. यावेळी आमदार भास्करशेठ जाधव यांनी माजी आमदार डॉ. विनय नातू आणि माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचेवरहि सडकून टिका केली

उमेदवारी अर्ज भरण्याआधी आम. भास्करशेठ जाधव यांनी गुहागर शहरात घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपाने २५ वर्ष मित्र असलेल्या शिवसेनेत फूट पाडली राष्ट्रवादी फोडली. मात्र टायगर अभी जिंदा है / हे लोकसभेत महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आता विधानसभेच्या निवडणुकीतून इसबार महायुती तडीपार हे दाखवून देण्याची गरज आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात माझ्या समोर विरोधकच नाहित. गेले काही महिने शिवसेना गद्दार असल्याची खोटी पत्रके डॉ. विनय नातू वाटत आहेत. खोट्याचे खरे करणा-या भाजपवाल्यांनी अनेकवेळा हिंदुत्वाशी आणि २०१९ मध्ये शिवसेनेशी गद्दारी केली. हिंदुत्व बाजूला ठेवून मुप्ती महमंद सईद यांच्याशी सत्तेसाठी युती केली.

माझ्या कुटुंबावर गलिच्छ भाषेत टिका करताना हसणारे विनय नातू आता साड्या वाटत फिरत आहेत. माझ्यावर टिका करण्यासाठी सद्या त्यांनी निळूभाऊंना नियुक्त केले आहे. विपुल कदम ९ कार्यालयांचे उदघाटन करुन गेले मात्र आता त्यांना त्यांचे लोकच शोधत आहेत. त्यांना खिंडीत येऊ द्या मग त्यांना हिसका दाखवतो सद्या राजेश बेंडल यांचे नाव चर्चेत आहे. मात्र हा माणूस सकाळी लवकर उठत नाही आणि रात्री घरी कामे भरपूर असल्याने गायब होतो हे मी स्वतः २००९ च्या निवडणुकीत अनुभवले आहे. राजेश बेंडल यांना स्वत:ला वडिलांचे नावाने वसतीगृह बांधता आले नाही. फसवून नगरपंचायत घेतली पण समस्या सोडवू शकले नाहीत. तो काय समाजाचा विकास करणार इथल्या बहूसंख्य कुणबी समाजाचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या बेटकरांनाही कुणबी समाजाची मते मिळाली नव्हती. या समाजाचा शिवसेनेवर, माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. लोकसभेत कुणबी समाजाचे नाव घेणारे राजेश बेंडल, रामचंद्र हुमणे गुरुजी यांनी अनंत गीते उमेदवार असूनही सुनिल तटकरेंचे काम केले होते. तेव्हा यांचेवर समाज विश्वास ठेवणार नाही तरीही आपण सावध राहिले पाहिजे वर्षानुवर्षे धनुष्यबाणासमोरील बटण दाबणा-या जनतेला आपली निवडणूक चिन्ह यावर्षी मशाल हे समजावून सांगा. तुमच्या प्रत्येक अडचणीत सोबत असणारा, तुमच्या समस्या विधानसभेत मांडणारा आमदार म्हणून मला निवडून द्या. असे आवाहन ही भास्करशेठ जाधव यांनी केले

या सभेला शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन शेठ बाईत,तालुका सचिव विलास गुरव,जिल्हा प्रमुख सचिन कदम, जि. प. चे माजी सभापती महेश नाटेकर, जिल्हा महिला संघटक अरुणा आंब्रे, कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष साबीर साल्हे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पद्माकर आरेकर,आरपीआयचे सुभाष मोहिते, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे,स्नेहा भागडे,नेत्रा ठाकुर, जयदेव मोरे, माजी सभापती वृषाली वैद्य, पूर्वी निमूणकर, विलास वाघे, दत्ताराम निकम, राजू साळवी, शरद साळवी आदी. पदाधिकारी उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई

■ ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई ■ २७ मार्च ला दाखल केला होता चौकशी अहवाल ■...
Read More
ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई

देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

“देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय” लांजा- (जितेंद्र चव्हाण).राजापूर तालुक्याच्या विकासासाठी...
Read More
देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read More
पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार नाशिक (गुरुदत्त वाकदेकर): कलावंत विचार मंच,...
Read More
नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६-  कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय 'ब्लॅक बेल्ट' परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या यशाने लांजाचा नावलौकिक; ७...
Read More
लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

■ राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश ■ अध्याप चौकशी न...
Read More
राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे...
Read More
टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): राजीव गांधी आंतरराष्ट्रीय...
Read More
पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

*पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ *२६वे कविसंमेलन दादरमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज;...
Read More
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा