दापोली कृषि विद्यापीठात जाणीव जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दापोली कृषि विद्यापीठात जाणीव जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम संपन्न

दापोली : (वार्ताहर) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीतील संशोधन कार्य हे शेतकरी वर्गापर्यंत पोहोचणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी यांनी बोलताना व्यक्त केले.ते आदर्शगाव विरसई येथील कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थिनींच्या कृषी नित्या आणि वसुंधरा गटाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी श्री. दळवी यांनी विद्यापीठामध्ये कृषी अंतर्गत होणारे सर्व संशोधनकार्य शेतकऱ्यापर्यंत पोहचले आणि ग्रामीण शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली तरच येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ होईल व येथील स्थानिक वर्ग नोकरीसाठी शहरांमध्ये न जाता इथेच थांबण्यास मदत होईल. त्यासाठी शाश्वत विकास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती केल्यास येथील लोकांचे अर्थाजन चांगल्या प्रकारे होईल असेही सांगितले. तसेच त्यांनी यावेळी ग्रामीण भागातील मुलींना विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आवाहन केले. कारण विद्यापीठातील अनेक विद्यार्थी विविध परीक्षांमधून अधिकारी वर्ग झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
आदर्शगाव विरसर्ई बद्दल बोलताना ते म्हणाले की या गावातील सर्व ग्रामस्थांची असणारी एकी व सहकार्याची भावना यामुळेच या गावाने माझी वसुंधरा ४.० यासह अनेक शासनाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. येथील महिलांना आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी यासाठी फळ प्रक्रियावर आधारित प्रशिक्षण विद्यापीठ अंतर्गत राबवणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. तसेच ग्रामपंचायत अधिकारी विरेश कदम व त्यांचे सर्व सहकारी यांचे वसुंधरा अभियानातील पुरस्काराबाबत विशेष कौतुक करून माझी वसुंधरा अभियान ५.० या साठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.पराग हळदणकर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.मकरंद जोशी, कृषी पर्यवेक्षक विनोद म्हस्के, कृषी सहाय्यक स्नेहल रहाटे, वनस्पती शास्त्र विभागाचे डॉ. उदयकुमार पेठे, उद्यान विद्या विभागाचे डॉ.महेश कुलकर्णी, वनस्पती रोग शास्त्र विभागाचे तज्ञ डॉ. राजेश भागवत, विशेष तज्ञ विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. रणजीत महाडिक, कीटकशास्त्र विभागाचे बापूसाहेब शंदे, कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रवीण झगडे, डॉ.मंदार पुरी, सरपंच मनोरमा राणे, ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष कृष्णा राणे, सचिव अनिल पिंपळकर, उपसरपंच विद्यार्थ्य जाधव,माजी सरपंच सुरेश वडतकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष हरि राणे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी, पत्रकार अजित सुर्वे, चेतन राणे, ग्रामस्थ, महिला, कृषी नित्या व वसुंधरा गटाच्या विद्यार्थिनी, विरेश्वर विद्यालयाचे शिक्षकवृंद, जिल्हा परिषद आदर्श शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam