ध्यास कवितेचा काव्य मंच मुंबई आणि ज्ञानदा वाचनालय उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कवि संमेलन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ध्यास कवितेचा काव्य मंच मुंबई आणि ज्ञानदा वाचनालय उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कवि संमेलन.


ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : ध्यास कवितेचा काव्य मंच मुंबई आणि ज्ञानदा वाचनालय उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या आनंदात आणि वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून “काळजात मराठी अभिजात मराठी” हे कविसंमेलन नुकतेच उल्हास विद्यालय उल्हानगर ४ येथे मोठ्या दिमाखात पार पडले.

ध्यास कवितेचा काव्य मंच मुंबई ही एक काव्यक्षेत्रात काम करणारी नावाजलेली संस्था असून वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी म्हणून गेली नऊ वर्षे माय मराठीचा जागर अविरतपणे करत आहे. २०२३ पासून ध्यासने “कविता आपल्या दारी” हा उपक्रम हाती घेतला असून त्या अनुषंगाने ध्यास कवितेचा काव्य मंच आणि ज्ञानदा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे कवी संमेलन उल्हासनगर येथे पार पडले. ह्यावेळी ५५ कवींनी उस्फुर्त सहभाग नोंदवून माय मराठीच्या बहारदार कविता सादर केल्या.

दरम्यान या कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी गझलकार प्रशांत दादा वैद्य यांची तर विशेष अतिथी म्हणून ज्ञानदा वाचनालयाचे अध्यक्ष सुरेंद्र सावंत यांची उपस्थिती लाभली. तसेच या कार्यक्रमाला कल्याण विभाग शिवसेना जिल्हाप्रमुख मा. धनंजय बोडारे यांनी धावती भेट देवून आयोजकांचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध कवी गझलकार प्रशांत दादा म्हणाले की, आजचा कवी समाज घडवू शकतो इतकी ताकद त्यांच्या लेखणीत आहे. समाजाची व्यथा मांडणारी कविता आजचा कवी लिहीत आहे. ध्यास कवितेचा काव्य मंच हा नुसता मंच नसून माझ्या अभिजात मराठीसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ह्यावेळी त्यांनी आपल्या कविता गझल सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी व्यासपीठावर ध्यासचे संस्थापक/अध्यक्ष संदेश भोईर, सचिव श्याम माळी, महिला विभाग प्रमुख स्नेहाराणी गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव श्याम माळी यांनी तर खुमासदार निवेदन सुनीता काटकर आणि ध्यासचे प्रसिध्दी प्रचार प्रमुख गुरुदत्त वाकदेकर यांनी तर आभार प्रदर्शन संदेश भोईर यांनी केले. उपस्थित कवींना आकर्षक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आश्विनी सोपान म्हात्रे, नीतुराज पाटील, जयंत पाटील, जयेश मोरे, विक्रांत लाळे, सुप्रसिध्द ग्राफिक डिझाईनर आपला बंड्या, ज्ञानदा वाचनालयाचे कार्यवाह वैभव कोंडूरकर, खजिनदार राकेश कांबळी, ग्रंथपाल दर्शना दिगंबर गावडे, सह ग्रंथपाल केतकी सावंत, रमेश तिरवडेकर यांनी मेहनत घेतली.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

Leave a Comment

आणखी वाचा...