गुहागर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री. प्रमोद गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला.
गुहागर – (वार्ताहर) गुहागर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री. प्रमोद गांधी तसेच महायुतीचे उमेदवार श्री. राजेश बेंडल या दोघांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपआपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून श्री. संतोष जैतापकर सुद्धा आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विक्रांत जाधव यांनी ही गुहागर मधून उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत गुहागर मध्ये चौरंगी लढत होणार .