मनोज जरांगें पाटील समर्थक गणेश कदम २९ रोजी डोंबिवलीमधून भरणार उमेदवारी अर्ज..,!
आबलोली (संदेश कदम) …
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगें पाटील यांचे कट्टर समर्थक गणेश कदम मंगळवार दिनांक २९ /१०/२०२४ रोजी डोंबिवलीमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
गणेश कदम हे मूळ गुहागरमधील काताळे गावचे सुपुत्र असून सद्या ते नोकरीधद्यामुळे डोंबिवलीत स्थायिक आहेत. मागील विधानसभेला त्यांनी मनसेच्या तिकिटावर गुहागर विधानसभा लढवली होती.
जाहीरनाम्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा केंद्रस्थानी असून मतदारसंघातील विकास देखील जलद गतीने करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. डोंबिवलीत आरोग्य, शिक्षण याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्न आजही गंभीर आहे त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्यास डोंबिवलीकर उत्सुक आहेत.
मनोज जरांगें पाटील यांचे निकटवर्तीय बबन जरांगें पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवार दि. २९ ,ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती गणेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.