११११ दिव्यांनी ४ दिवस उजळणार राम मंदिर ४ दिवस विविध उपक्रमांचे आयोजन- नरवण राम मंदिरात सलग १७ व्या दीपोत्सवाचे आयोजन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 नरवण राम मंदिरात सलग १७ व्या दीपोत्सवाचे आयोजन.

११११ दिव्यांनी ४ दिवस उजळणार राम मंदिर
४ दिवस विविध उपक्रमांचे आयोजन

राम मंदिर, नरवण

.

तळवली (मंगेश जाधव)-
गुहागर तालुक्यातील नरवण येथील श्री राम मंदिरात हिंदू धर्मात आध्यात्मिक क्षेत्रात फार महत्त्वाचे स्थान आहे दीपोत्सवाचे सलग १७ व्या वर्षी श्रीराम दीपोत्सव मंडळाच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सन 2008 साली श्रीराम दीपोत्सव मंडळाच्यावतीने या दीपोत्सवाला प्रारंभ करण्यात आला.सलगच्या १७ व्या वर्षी ३१ ऑक्टोबर २०२४ ते ३ नोव्हेंबर २०२४ या ४ दिवसीय दीपोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमाने करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजता डॉक्टर श्री कैलास सुरेश वैद्य यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून व महाआरतीने या दीपोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७:३० महा आरती, रात्री १० वा.स्वरसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७:३० वा. महाआरती व रात्री ठीक १० वाजता श्रीराम नमन नाट्य मंडळ, कामथे, हुमणेवाडी, तालुका चिपळूण यांचे पारंपारिक नमन सादर केले जाणार आहे.रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता महाआरती व स्थानिक भजने होऊन या दीपोत्सवाची सांगता केली जाणार आहे. गुहागर तालुक्यामध्ये मागील १७ वर्ष सलग ४ दिवस ११११ दिवे उजळून साजरा होणारा दीपोत्सव हा एकमेव असून या दीपोत्सवाला व आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमाला तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम दीपोत्सव मंडळ नरवण यांनी केले आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

Leave a Comment

आणखी वाचा...