गुहागर विधानसभा मनसेमध्ये बंडखोरी नाही..!
मनसेचे अधिकृत उमेदवार प्रमोद गांधी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर..!
आबलोली (संदेश कदम)..
गुहागर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोणीही बंडखोरी केली नसून खेड तालुक्यातील संदीप फडकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यानी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संदीप फडकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मनसेच्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे गुहागर विधानसभा क्षेत्रात मनसेमध्ये बंडखोरी झाली हे म्हणणे चुकीचे असल्याचे गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की,मनसेचे अधिकृत उमेदवार म्हणून गुहागर मधून गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर जिल्हा अध्यक्ष संतोष नलावडे यांच्या मागणीने अधिकृत उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी त्यामुळे गुहागर विधानसभा क्षेत्रात प्रमोद गांधी सोडून इतर कोणत्याही पदाधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. खेडचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी वैयक्तिकरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्जाशी मनसे पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.