लक्ष्मी पूजन….

बहुतेक घरांमध्ये, मुले हे दोन प्रश्न नक्कीच विचारतात की जेव्हा 14 वर्षांच्या वनवासातून प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा दिवाळीला लक्ष्मीची पूजा का केली जाते? प्रभू श्रीराम आणि सीता मातेची पूजा का केली जात नाही?
दुसरे म्हणजे, दिवाळीला लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा का केली जाते, भगवान विष्णूची का नाही?

या प्रश्नांची उत्तरे बहुतेक मुलांना मिळत नाहीत आणि जी उत्तरे मिळतात त्यातून मुले संतुष्ट होत नाहीत आजच्या पारिभाषिक शब्दांनुसार काही ‘ लिबरल्स’ मुलांच्या मनात लक्ष्मीपूजनाचे औचित्य काय असा प्रश्न निर्माण करत आहेत, दिवाळीचा सण तर रामाशी संबंधित आहे. एकंदरीत ते मुलांचे ब्रेनवॉश करत आहेत की सनातन धर्माचा आणि सनातन उत्सवांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

खर तर दिवाळी हा सण सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन युगांशी संबंधित आहे.

सत्ययुगात समुद्रमंथनामुळे त्या दिवशी माता लक्ष्मीदेवी प्रकट झाली होती, म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते.त्रेतायुगात या दिवशी प्रभू श्रीरामही अयोध्येला परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी घरोघरी दिवे लावून त्यांचे स्वागत केले, म्हणून त्याचे नाव दीपावली आहे.

त्यामुळे या पर्वाची दोन नावे आहेत, लक्ष्मीपूजन जे सत्य युगाशी संबंधित आहे आणि त्रेतायुगातील प्रभू श्रीराम आणि दिवे यांच्याशी संबंधित दुजा दिवाळी.

माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे नाते काय?
आणि दिवाळीत या दोघांची पूजा का केली जाते?

सागरमंथनात माता लक्ष्मी जी सापडल्या, भगवान विष्णूनी त्यांच्याशी लग्न केले आणि त्यांना सृष्टीची धन संपत्तीची आणि ऐश्वर्याची देवी बनवण्यात आले.

माता लक्ष्मीजींनी धन संपत्ती वाटण्यासाठी कुबेराला आपल्यासोबत ठेवले, कुबेर खूप कंजूस होता, त्याने धन वाटलेच नाही उलट तो स्वतःच धनाचा भंडारी होऊन बसला, हे पाहून माता लक्ष्मी दुःखी झाल्या, त्यांच्या मुलांना आशीर्वाद मिळत नव्हता. त्यांनी आपली व्यथा भगवान विष्णूना सांगितली. भगवान विष्णूंनी सांगितले की, कुबेराच्या जागी संपत्ती वाटण्याचे काम दुसऱ्यावर सोपवा. माता लक्ष्मीजी म्हणाली की यक्षांचा राजा कुबेर हा माझा महान भक्त आहे, त्याला वाईट वाटेल. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना गणपतीच्या अफाट बुद्धीचा उपयोग करण्याचा सल्ला दिला, माता लक्ष्मीजीनीही गणेशजींना कुबेरा सोबत ठेवले.गणेशजी अतिशय बुद्धिमान होते. ते बोलले, माताश्री, मी तुम्हाला कोणाचेही नाव सांगेल, त्यांना तुम्ही कृपा आशीर्वाद द्या. मला कुठलाही उलट किंतू परंतु प्रश्न विचारू नका, माता लक्ष्मीजी हो म्हणाल्या , व गणेशजींनी लोकांच्या धन सौभाग्याचे अडथळे दूर करण्यास सुरुवात केली, कुबेर फक्त पाहत राहिला आणि अशा प्रकारे कुबेरांच्या भांडाऱ्याची द्वारे गणेशजीनी उघड केली.

भगवान गणेशाची आपल्या भक्तांप्रती असलेली प्रेमळ कृपा पाहून माता लक्ष्मीने आपला मानसपुत्र श्री गणेश याला आशीर्वाद दिला की ज्यावेळी माझे पती नारायण माझ्या सोबत नसतील त्यावेळी माझा पुत्र म्हणून तू माझ्यासोबत रहावे.

दिवाळी अश्विन अमावस्येला येते, त्यावेळी भगवान विष्णू योग निद्रामध्ये असतात, ते अकरा दिवसांनी देव उथनी एकादशीला जागे होतात. शरद पौर्णिमा आणि दिवाळी या मधील पंधरा दिवसांत माता लक्ष्मीला पृथ्वी भ्रमण करण्यासाठी यावे लागते, म्हणून त्या आपला मानसपुत्र गणेशजींना सोबत घेऊन येतात, म्हणून दिवाळीला लक्ष्मी गणेशाची पूजा केली जाते.

किती मोठी विडंबना आहे की, देशातील आणि हिंदूंच्या सर्वात मोठ्या सणाचे तपशीलवार वर्णन अभ्यासक्रमात कुठेही नाही आणि जे वर्णन आहे ते अपूर्ण आहे, हा लेख वाचून स्वतः ही माहिती लक्षात ठेवा, आणि आपल्या पुढच्या पिढीलाही सांगा व इतरांनाही शेअर करायला विसरू नका.

माझ्या सर्व हिंदू बांधवांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!????????

जय हिंद!????????
– जय श्री राम ????

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें