मराठी रंगभूमीचे अस्तित्व कायम ठेवण्याचे विघ्नहर्ताचे मराठी रंगभूमीदिनी आवाहन !

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी रंगभूमीचे अस्तित्व कायम ठेवण्याचे विघ्नहर्ताचे मराठी रंगभूमीदिनी आवाहन !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दीडशे वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा असलेली मराठी रंगभूमी अनेक संकटे झेलत उभी आहे. तिचे ऐतिहासिक अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञ कायम झटत राहातील, असा विश्वास मान्यवरांनी मराठी रंगभूमीदिन सोहळ्यात बोलून दाखवला.

राज्य नाट्य स्पर्धेत सलग पाच वेळा प्रथम क्रमांक पटकविणारे आणि सहाव्या अपेक्षित नामांकणाच्या प्रतिक्षेत असलेल्या श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने माटुंग्याच्या यशवंत चव्हाण नाट्यगृहात मराठी रंगभूमीदिन थाटामाटा संपन्न झाला, त्यावेळी मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात मराठी रंगभूमी विषयी आपली अस्मिता व्यक्त केली.

समारंभाला ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक दत्ता सावंत, कामगार नाट्यरंगभूमीशी निगडित ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल, हौशी रंगभूमीच्या चळवळीत स्वतःला झोकून देऊन कार्यरत असणारे नाटककार रवी वाडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष स्थानी श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता मोरे होते.

मराठी रंगभूमीदिनाच्या औचित्याने नाट्यचळवीत प्रदीर्घकाळ कार्यरत राहून रंगभूमीची शान वाढविणारे रंगकर्मी बाबा निवतकर, अरविंद रुणकर, संतोष चव्हाण, श्याम जावकर, संतोष सामंत, अशोक प्रधान यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या एकांकिका लेखन स्पर्धेतील प्रथम विजेते, मुंबईच्या मैदाने बचाव चळवळीचे प्रणेते भास्कर सावंत यांचा मानपत्राने सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या काव्यवाचन स्पर्धेतील प्रथम विजेती स्वाती शिवशरण, द्वितीय विजेता सागर सोनावणे, उत्तेजनार्थ मकरंद हळदणकर यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून लेखक कवियत्री विद्या निकम आणि कवी नंदकुमार सावंत यांनी काम पाहिले.

सदर प्रसंगी अध्यक्ष दत्ता मोरे म्हणाले, रंगभूमीशी निगडित असलेल्या कला विषयक स्पर्धा घेऊन आम्ही जाणकार कलावंत घडविण्याचे काम करत आहोत. लेखक दत्ता सावंत मराठी रंगभूमीदिनाची महती विषद करताना म्हणाले, सन १८४३ मध्ये “सीता स्वयंवर” या नाटकाचा पहिलाच नागरी प्रयोग सांगलीत यशस्वी झाला. तो दिवस थोर नाकटकार विष्णूदास भावे यांच्या स्मृतीने‌ साजरा होतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल साळवे यांनी केले. प्रास्तविक लेखक महेंद्र कुरघोडे यांनी केले. आभार उपाध्यक्ष राज जैतपाळ यांनी मानले. संस्थेचे विजय सक्रे, अमन दळवी, जयवंत सातोस्कर आदींचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. ज्येष्ठ नाट्य, चित्रपट‌ आणि मालिका रंगकर्मी राघव कुमार यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam