मुंबई – तवसाळ एस. टी. गुहागर येथून दुपारी ०२:३० वाजता सुटल्यास आबलोली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल.

मुंबई – तवसाळ एस. टी. गुहागर येथून दुपारी ०२:३० वाजता सुटल्यास आबलोली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल..!

(ग्रामिण भागातून आबलोली येथे शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थ्यांना परतीचा प्रवास होईल सुखकर..!)

आबलोली (संदेश कदम)….

गुहागर तालुक्यातील लोक शिक्षण मंडळ आबलोली संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आबलोली येथे आबलोली पंचक्रोशीतील मासू, आवरे फाटा, जांभारी, सडेजांभारी, कुडली, पडवे, तवसाळ या मार्गावरून शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या २५ ते ३० विद्यार्थ्यांना आबलोली येथे इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षणासाठी शाळेच्या वेळे प्रमाणे सुट्टीचे दिवस सोडून शाळेच्या वेळे नुसार सकाळी १०:१० वाजता शाळा भरते व सायंकाळी ०४:१० शाळा सुटते परंतू शाळा सुटल्यानंतर ब-याच विद्यार्थ्यांना वेळेत घरी जाण्यासाठी परतीचा प्रवास करताना गैरसोय होते यात वेळ व पैसा खर्च होतो व शैक्षणिक नुकसान होते. या विद्यार्थ्यांना सायंकाळी ०६:०० ते ०६:३० पर्यंत आबलोली येथेच एस. टी. ची वाट बघत थांबावे लागते

यामध्ये विद्यार्थ्यांचा रोजचा साधारण दोन तास वेळ वाया जातो. तरी गुहागर डेपो मधुन दुपारी ०१:३० वाजता सुटणारी मुंबई तवसाळ हि एस. टी. गाडी आबलोली मध्ये दुपारी ०३:०० वाजता येते व सायंकाळी ०४:०० वाजता तवसाळ येथे पोहचते तरी या एस. टी. च्या वेळेत थोडा बदल करुन हि एस. टी. गुहागर मधूनच दुपारी ०२:३० वाजता सुटली तर आबलोली मध्ये सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत पोहचेल किंवा तवसाळ येथे हिच एस. टी. एक तास थांबते त्याऐवजी ०३:०० ते ०४:०० या वेळेत एक तास आबलोली येथे थांबली व शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन गेली तर त्यामुळे मासू, आवरे फाटा, जांभारी, सडेजांभारी, कुडली पडवे, तवसाळ या ग्रामिण भागातून आबलोली येथे शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या जवळ पास २५ ते ३० विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि शैक्षणिक नुकसान टळेल

तरी विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी मुंबई – तवसाळ एस. टी. आबलोली येथून विद्यार्थ्यांच्या शाळा सुटण्याच्या वेळेत सुटल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल..! तरी विद्यार्थ्यांची परतीच्या प्रवासासाठी गैरसोय व शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपण स्वतः जातीने लक्ष घालून मुंबई – तवसाळ या गाडीची वेळ बदलून गुहागर मधून दुपारी ०२:३० वाजता सोडून आमच्या विद्यालयास सहकार्य करावे असे विनंती वजा लेखी पत्र गुहागर तालुक्यातील आबलोली येथील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आबलोली यांचे मुख्याध्यापक श्री. डि.डि.गीरी यांचे सहिने देण्यात आले आहे.त्यामुळे आबलोली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें