निवडणूक निर्विघ्नपणे, पारदर्शी पार पाडण्यासाठी सर्वांनी काम करावे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणूक निर्विघ्नपणे, पारदर्शी पार पाडण्यासाठी सर्वांनी काम करावे

निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

 

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये सर्व पथकांची कामे चांगल्या पध्दतीने सुरु आहेत. यापुढेही विवाद होणार नाहीत. पारदर्शीपणाने आणि निर्विघ्नपणे निवडणूक पार पडेल अशा पध्दतीने सर्वांनी काम करावे, अशा सूचना सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात काल सायंकाळी जिल्हास्तरीय समन्वय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. बैठकीला सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक पाठक, खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेंद्र प्रसाद मीना, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. 263-दापोली, 264-गुहागर विधानसभा मतदार संघासाठी सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक सुमित के जरांगल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन विविध पथकांचा सविस्तर आढावा घेतला. सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक पाठक म्हणाले, इटीबीपीएस, पोस्टल बॅलेट, इव्हीएम, मतदार यादी यावर भर द्या. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाचे चांगल्या पध्दतीने पालन करुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामकाज करावे. सर्व कामकाजाबाबत त्यांनी स्वत: खात्री करावी. कोणतेही वादविवाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

खर्च निरीक्षक कुमार म्हणाले, अनधिकृत येणारी रक्कम अन्य बाबींवर एसएसटी, एफएसटी ने लक्ष द्यावे. तपासणी नाक्यावर तपासणी होते की नाही यावरही लक्ष ठेवावे. सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक जरांगल म्हणाले, प्रत्येक निवडणूक ही आपल्यासाठी नवीन असते. अशा पध्दतीने सर्वांनी सतर्कतेने काम करावे. निवडणूक निरीक्षक (पोलीस) मीना म्हणाले, एफएसटी, एसएसटी हे चांगले काम करत आहेत. तरीही येणाऱ्या काळात अधिक प्रभावीपणे कामकाज करावे.

जिल्हाधिकारी सिंह यांनीही यावेळी निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. या बैठकीला सर्व पथकांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई