प्रमोद गांधी यांनी केला भास्कर जाधवांच्या कामांचा पर्दाफाश…

विद्यमान आमदारांची दादागिरी जनता नक्कीच संपवेल

प्रमोद गांधी यांनी केला भास्कर जाधवांच्या कामांचा पर्दाफाश

गुहागर- (आशिष कारेकर)….

गावागावात प्रचारासाठी फिरताना गुहागर मतदारसंघात सर्वांना बदल पाहिजे,परिवर्तन पाहिजे हे बोलले जात आहे.विद्यमान आमदारांची दादागिरी आणि त्यांचा अहंकार येथील जनता नक्कीच संपवेल सध्याच्या आमदारांनी गुहागरचा विकास हा रस्ते आणि पाखाड्यांपुरताच मर्यादित ठेवला असा भास्कर जाधवांच्या विकासकामांचा पर्दाफाश मनसे उमेदवार प्रमोद गांधी यांनी केला.

शृंगारतळी येथील राज ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना गांधी म्हणाले,मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे.एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला राजसाहेबांनी उमेदवारी दिली या संधीचे मी नक्कीच सोने करेन.ते पुढे म्हणाले येथील आरोग्यव्यवस्था व्हेंटीलेटरवर गेली आहे.याठिकाणी मोठा समुद्रकिनारा आहे पण पर्यटन व्यवस्था शून्य आहे.विद्यमान आमदार रस्ते पाखाड्या दाखवत आहेत मात्र राजसाहेबांचे व्हिजन फार मोठे आहे.येथील विद्यार्थी 15 ते 20 हजारांच्या नोकरीसाठी मुंबईत जात आहेत त्यांना रोजगार कसा दिला जाईल माझा प्रयत्न आहे.येथील अनेक मराठी शाळा नादुरुस्त आहेत त्या दुरुस्ती करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत.मला आपण एक संधी द्या मी नक्कीच या संधीचे सोने करेन असे आवाहन प्रमोद गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें