राजेश बेंडल यांच्या विजयासाठी आर. पी. आय.आठवले पक्ष प्रचारात अग्रेसर

राजेश बेंडल यांच्या विजयासाठी आर. पी. आय.आठवले पक्ष प्रचारात अग्रेसर

गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड

आबलोली (संदेश कदम)

निवडणूकीची धामधूम जोरदार चालू आहे. महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारार्थ गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. सभेला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेली विक्रमी गर्दी पहाता महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा विजय हा निश्चित झाला असून गुहागर मतदारसंघात राजेश बेंडल यांच्या प्रचारार्थ आर. पी. आय. आठवले पक्षाचे राष्ट्रीय नेते, नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारात आर. पी. आय. आठवले पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अग्रेसर राहून राजेश बेंडल यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरील तीन नंबरचे बटण दाबून राजेश बेंडल यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी कंबर कसली असून राजेश बेंडल यांना विक्रमी मतांनी विजयी करणार असा निर्धार केला असून महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांनाच रिपब्लिकन आणि बौद्ध जनतेने मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे. या महायुतीच्या प्रचारात वाडी – वाडीत घरा -घरात आर. पी. आय. आठवले पक्षाच्या वतीने प्रचार यंत्रणा जोरदार राबविण्यात येत असून आर. पी. आयचे तालुका अध्यक्ष संदिप कदम,जिल्हा उपाध्यक्ष विजू आप्पा कदम, जिल्हा सदस्य मारुती मोहिते, तालुका प्रवक्ते शशिकांत जाधव,तालुका सरचिटणीस सुनिल गमरे,चिटणीस दशरथ पवार, माजी तालुका अध्यक्ष महेंद्र आप्पा कदम, तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव, विलास गमरे, जेष्ठ कार्यकर्ते शंकर मोहिते, सचिन मोहिते, सोशल मीडिया व आयटी सेलचे गुहागर तालुका अध्यक्ष संदेश कदम आदी. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजेश बेंडल यांच्या विजयासाठी प्रचारात आघाडी घेतली असून राजेश बेंडल यांना विक्रमी मतांनी निवडून आणणारच असा ठाम निर्धार केला आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें