शब्द फराळासह चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत दीपावली कविसंमेलन संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शब्द फराळासह चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत दीपावली कविसंमेलन संपन्न

मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांची अविरत साहित्य सेवा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सारस्वतांनी तयार केलेल्या विशेष साहित्य फराळासह चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात दिवाळी निमित्त उत्तमोत्तम रचनांचा नजराना पेश केला.

“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने ९वे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी युवा साहित्यिक, अभिनेते, गायक तसेच कवी/गीतकार महेंद्र रामचंद्र पाटील हे अध्यक्षस्थानी होते. त्यांचे ज्येष्ठ कवी अशोक कांबळे यांच्या हस्ते तसेच ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये मानाची शाल, “कल्पदीप” ह्या पुस्तकाची कल्पना मापूसकर यांच्या उपस्थितीमध्ये तसेच स्वाक्षरीसह ग्रंथभेट आणि सुंदरसे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले.

कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये अशोक बिरबल कांबळे, शोभा प्रकाश कोठावदे, आश्विनी सोपान म्हात्रे, विक्रांत मारूती लाळे, नंदन भालवणकर, वैभवी विनीत गावडे, डॉ. मानसी पाटील,अनिल खेडेकर, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, रविंद्र शंकर पाटील, सरोज सुरेश गाजरे, कल्पना दिलीप मापूसकर, हर्षा हिरा पाटील, विनोद तुळशीराम घाणेकर, गौरी यशवंत पंडित, प्रमोदिनी अनिल देशमुख, रामकृष्ण चिंतामण कामत, सीमा विश्वास मळेकर, श्रीशैल नंदकुमार सुतार, किशोरी शंकर पाटील तसेच सनी आडेकर यांनी दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष महेंद्र रामचंद्र पाटील यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

मध्यंतरामध्ये आयोजकांनी आणलेल्या चहा अल्पोपहारासोबत महेंद्र पाटील यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले गुलाबजाम, समोसे आणि बर्फी, तसेच गौरी पंडित, शोभा कोठावदे, सरोज गाजरे यांनी आणलेला गोडाधोडाच्या खाऊचा आस्वाद घेताघेता अनिल खेडेकर यांनी सादर केलेली मैत्रीवरची सुंदर लघुकथा सर्वांना मैत्रीची व्याख्या सांगून गेली. नंदन भालवणकर तसेच पूर्व संमेलनाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी त्यांच्या रचना गेय स्वरुपात सादर केल्या. दुसर्‍या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.

संमेलनाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सादर केलेल्या “दगड” कवितेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी आयुष्यात पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. गुरू सरांचे शिस्तबध्द सूत्रसंचालन अतिशय उत्तम होते. कविता ऐकण्यासाठी आलेले खास आस्वादक ह्यांची मनोगतेही उत्तम होती. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या. तसेच पुढील संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी डॉ. मानसी पाटील यांचेही अभिनंदन केले.

कार्यक्रमाचा आणि कवितांचा आस्वाद घेण्यासाठी ज्यांचा आवाज त्यांची ओळख आहे त्या साहित्यिका निवेदिका अभिवाचक ग्रंथपाल नमिता नितीन आफळे विशेषत्वाने उपस्थित होत्या. बालकवी वेदान्त पंडित, ज्येष्ठ कवी अशोक भाई नार्वेकर, अनिल (काका) देशमुख, प्रकाश कोठावदे, सुनिता निरज कोठावदे आणि देविका अशोक कांबळे रसिक म्हणून आवर्जून उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील आणि विक्रांत लाळे यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता करताना “शोध आनंदाचा फाऊंडेशन” चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

अलिबाग सहल कविसंमेलन ७-८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी विक्रात लाळे 9322866947, शैलेश निवाते 9773873538 आणि रविंद्र पाटील 8928490260 यांच्यासोबत संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.

१०वे मासिक कविसंमेलन शनिवार २१ डिसेंबर २०२४ (अंदाजित) होणार असून त्याच्या अध्यक्षपदी भौतिकोपचार तज्ज्ञ तसेच साहित्यिका डॉ. मानसी पाटील असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.

कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...