वेलदूर नवानगर शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून घेतले उद्योजकतेचे धडे……क्षेत्रभेटीतून प्राचीन संस्कृतीचे दर्शन
…….क्षे
त्रभेटीतून मिळाला जलविहाराचा मनसोक्त आनंद……
गुहागर – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी या शाळेची क्षेत्रभेट परवेली येथील अभिषेक एंटरप्राइजेस या बटन फॅक्टरीचे सर्व कामकाज पाहण्यासाठी गेली होती क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मोडका घर डॅम येथे मनसोक्त जलविहाराचा आनंद लुटला . विद्यार्थ्यांना नरवण येथे प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन बगाडा उत्सवातून घडले .गुहागर बीच, ऐतिहासिक व निसर्ग संपन्न पर्यटन क्षेत्रातील श्री व्याडेश्वर देवस्थान, ऐतिहासिक दुर्गादेवी देवस्थान ,श्री गणेश मंदिर तसेच प्राचीन भारतीय संस्कृतीशी नाते जोडणारे नरवण या ठिकाणी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रथम श्री दुर्गामाता नंतर गुहागर येथे श्री व्याडेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी मोडकाघर येथे नौका विहारचा आनंद लुटला. अभिषेक इंटरप्राईजेस या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बटन फॅक्टरी ला भेट दिली .बटन कसे तयार होते ,बटणे ड्रिलिंग कशी करावीत ,डाय कशी तयार करावी ,पॅकिंग कशी करावे ,विविध आकर्षक बटणे कशी तयार करावीत, बटनांसाठी बाजारपेठ कशी उपलब्ध करावी ,बटन व्यवसायातून होणारे रोजगार निर्मिती याची माहिती कंपनीचे मॅनेजर श्री.झगडे यांनी दिली. नंतर नरवण येथे बघाड पाहिला. बगाडा उत्सवातील वैज्ञानिक तथ्य विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
गुहागर बीच येथे विद्यार्थ्यांनी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. विद्यार्थ्यांना नवीन व्यावसायिक दृष्टिकोनाचा अनुभव आला .विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट सफल झाली. सदर क्षेत्र भेट मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,सौ. मुद्दामवर मॅडम, मोरे मॅडम, गायकवाड मॅडम, मुल्ला मॅडम यांनी क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले















