तळवली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा...

तळवली (मंगेश जाधव)..

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर जि. रत्नागिरी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

प्रारंभी मुख्याध्यापक श्री. एम. ए.थरकार सर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व सर्व उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. त्यानंतर इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. समीरा जोशी हिने प्रास्ताविक व स्वागत केले. कु. स्वरा साळवी, कु.श्रावणी पवार,को.माही मयेकर या विद्यार्थिनीनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर अशी भाषणे केली. त्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंगावर प्रकाशझोत टाकला.

यावेळी मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकर जसे वाचन प्रेमी होते,शिक्षण प्रेमी होते, ग्रंथ वेडे होते. त्या जोरावरच त्यांनी उच्च ज्ञान आत्मसात केले. त्यामुळेच जगातील मोजक्या ज्ञानी लोकांमध्ये त्यांची गणना होते. म्हणून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. असे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या भेटीचा एक प्रसंग तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीनाथ कुळे सर व इतर सहकारी शिक्षक वृंद यांनी केले होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेया गिजे,समीरा जोशी, माही मयेकर व पायल धामणस्कर या विद्यार्थिनीनी प्रास्ताविक, स्वागत,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन या जबाबदा-या यशस्वीरीत्या पार पाडल्या. त्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर,श्री.केळस्कर सर, श्री.गवळी सर,प्रा.जड्याळ सर, सौ. नाईक मॅडम, श्री पुनस्कर सर,प्रा.सावंत मॅडम, लिपिक श्री.कदम सर, श्री. अक्षय चव्हाण, श्री.प्रणय आरोलकर इत्यादी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच इयत्ता 5वी ते 12 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या...
Read More
भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश आबळोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश...
Read More
आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील...
Read More
एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश

नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण

नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना हाताला काम देणारी महात्मा गांधी...
Read More
नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण

लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी

🔴 लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी : ७६ दिवसांपासून सुरू धरणे आंदोलन;...
Read More
लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

*खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार   राजगुरुनगर (गुरुदत्त वाकदेकर): येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि महात्मा...
Read More
खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६...
Read More
गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात

नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार

नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार गुहागर - गेले पंचवीस तीस वर्ष भजनी कलावंत म्हणून काम...
Read More
नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील...
Read More
अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील...
Read More
सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय