गं. द. आंबेकर राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धेत सोलापूर संघ अजिंक्य!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गं. द. आंबेकर राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धेत सोलापूर संघ अजिंक्य!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी गं. द. आंबेकर यांच्या ६० व्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने ना. म. जोशी मार्ग, श्रमिक जिमखाना येथे रविवारी पूर्ण दिवस खेळविण्यात आलेल्या स्पर्धेत, कावेरी‌ नगर वि. सोलापूर जि. युथ फाऊंडेशन मनोराजुरी संघ २१ × १० अशी एकतर्फी लढत‌ होऊन, सोलापूर जि. युथ फेडरेशन संघ अजिंक्य ठरला.

सामान्यात उपविजयी कावेरी नगर, पुणे हा संघ ठरला. विजयी संघाला आंबेकर चषक-११ हजार रुपये रोख आणि उपविजयी संघाला आंबेकर चषक-८ हजार रुपये रोख पारितोषिके, उपांत्य पराभूत संघाना प्रत्येकी ५ हजार रोख व चषक देऊन सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष क्रीडा प्रमुख सुनिल बोरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सामन्याचे उदघाटन शुटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीस दीपक सावंत आणि युनियन उपाध्यक्ष माजी नगरसेवक सुनिल अहिर यांच्या हस्ते पार पडले. उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे, साई निकम, कार्यालयीन अधिक्षक मधु घाडी आदी त्या वेळी उपस्थित होते.

उपांत्यपूर्व लढती अशा‌ झाल्या:- (१) कावेरी वि. शासकीय दूध डेअरी २१/१९, (२) संजय भोसले प्रतिष्ठान वि. सेल्यूट पुणे २१/१९, (३) सोलापूर जि. वि. सातारा जि. २१/१८, (४) खानापूर वि. मालेगाव २१/१२.

उपांत्य लढती:- (१) कावेरी वि. संजय भोसले प्रतिष्ठान २१/११, (२) सोलापूर जि. वि. खानापूर जि.२१/१५ अशा झाल्या.

शुटिंगबॉल सामान्यत प्रथम सोलापूर, द्वितीय कावेरी, तृतीय क्रमांक खानापूर संघ,चौथा क्रमांक संजय भोसले प्रतिष्ठान.सर्व‌ विजेत्या संघांना आंबेकर चषकासह रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट शुटर दस्तगीर (कावेरीनगर पुणे), सामनावीर जयंत खंडागळे (सोलापूर जिल्हा.) यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेय एकूण २६ बलाढ्य संघ‌ खेळले‌. २१ गुणांचा एक सामना घेण्यात येऊन‌, सामने बाद पध्दतीने खेळविण्यात आले. शुटिंगबॉल सामने यशस्वी करण्यासाठी मुंबई शुटिंगबॉल असोसिएशनचे सरचिटणीस दीपक सावंत, सामना प्रमुख अशोक चव्हाण, कार्याध्यक्ष जालंदर चकोर, स्पर्धा निरीक्षक खजिनदार प्रफुल्लकांत वाईरकर, निरीक्षक तथा सहसचिव मिलिंद बिर्जे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग सुतार इत्यादी मान्यवरांचे श्रम लक्षणीय ठरले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...
Read More
दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद! कोकण दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी केली एसटी...
Read More
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

‘चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या...
Read More
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेतून परवडी कुटुंबाला...
Read More
विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा...
Read More
तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न