कालुस्ते बु. गावातील दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांनी घेतले गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कालुस्ते बु. गावातील दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांनी घेतले गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण…

तळवली (मंगेश जाधव)……

दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी फक्त दुधाचे उत्पन्न डोळ्यासमोर न ठेवता शेणाचा उपयोग करून गांडूळ खत निर्मितीकडे देखील उत्पन्नाचे साधन बघितले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून TWJ फाऊंडेशन आणि फॅन्ड्री फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 डिसेंबर 2024 या दिवशी कालुस्ते बु. गावात गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

निलेश कमलाकर कदम या दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांच्या वाड्याजवळ प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्लॅस्टिक बेड चा उपयोग करून गांडूळ खत निर्मिती करता येते याची प्रथम माहिती देऊन हा बेड कसा उभा करायचा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. खत निर्मिती होण्यासाठी आवश्यक असलेले शेण, पाला पाचोळा, नारळाची सोडणे, सुखे गवत या गोष्टी कच्चा माल म्हणून उपलब्ध असणे आवश्यक आहे याची माहिती देण्यात आली. हा कच्चा माल उभा केलेल्या बेड मध्ये क्रमवारी कशा पद्धतीने भरून घ्यायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. आवश्यक साहित्याने बेड पूर्ण भरून झाल्यावर शेवटी खत निर्मिती करणारे गांडूळ बेड मध्ये सोडण्यात आले. सुरुवातीला आणि नंतर किती प्रमाणात पाणी मारण्याची आवश्यकता आहे याची देखील माहिती देण्यात आली.

या प्रशिक्षणात गांडूळ खताचे मार्केट कसे आहे, आपण स्वतः ते कसे उभे करायचे या विषयी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले. जवळपास 22 शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. फॅन्ड्री फाऊंडेशन संस्थेने दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मिती करून आपल्या अर्थार्जनात वाढ करावी यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना बेड उपलब्ध करून दिले. ग्रामीण अर्थव्यवस्था ही निसर्गावर आधारीत असून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ही अर्थव्यवस्था टिकून रहाण्यासाठी शेती आणि शेती पूरक व्यवसाय शिवाय पर्याय नाही. TWJ फाउंडेशन संस्था ग्रामविकास अंतर्गत शाश्वत अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी अशा प्रकारचे शेती पूरक व्यवसाय प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी