केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा मोंभार क्रीडानगरी, पाचेरी सडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न
गुहागर – सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पाचेरी आगर केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा *मोंभार क्रीडानगरी, पाचेरी सडा* या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा यशस्वी व भव्य दिव्य करण्यासाठी विशेषतः *त्रिमूर्ती ग्रामविकास मंडळ, मुंबईकर पाणबुडीची लेकरं मंडळी*,सर्व पालक, सर्व ग्रामस्थ व शिक्षक वृंद पाचेरी सडा या सर्वांनी गेले आठ दिवस परिश्रम घेऊन मैदान तयारी, जेवण तयारी , तसेच पाण्याची व्यवस्था सर्व कामे चोखपणे बजावून एक आदर्शवत केंद्रस्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन कसे असावे याचा आदर्श घालून दिला. याबद्दल पंचक्रोशितील सर्व गावातील ग्रामस्थ यांनी पाचेरी सडा गावातील ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.महिला मंडळ , पाचेरी सडा यांनी अतिशय मेहनत घेऊन दोन दिवस साधरण १४०० ते १५०० खेळाडू, शिक्षक , ग्रामस्थ तसेच पाहुणे मंडळी यांना चहा , नाष्टा व जेवण दिले याबद्दल सर्व महिला मंडळाचे कौतुक करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देणगी दिलेले सर्व देणगीदार यांच्या मुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्द