शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाण पत्र प्रदान..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाण पत्र प्रदान..!

 

कौशल्य विकास,रोजगार व नावीन्यता विभाग महाराष्ट्र राज्य व महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम..!

आबलोली (संदेश कदम) 

चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली या विद्यालया मधील ९० विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास,रोजगार व नाविन्यता विभागाकडून कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करणयात आले.सन २०२३ मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ व कृषि कौशल्य विकास परिषद,नवी दिल्ली यांचेकडून शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयास कौशल्य विकास केंद्राची मान्यता मिळाली.याच अनुषंगाने प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेमधून महाविद्यालयामध्ये कृषि व्यवसाय अभ्यासक्रमावर आधारित मृदा व जल तपासणी तंत्रज्ञ,कृषि प्रक्षेत्र अधिकारी व फळ व भाजीपाला निर्जलीकरण तंत्रज्ञ या विषयांचा यामध्ये प्रशिक्षणासाठी समावेश करण्यात आला.तीन महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी महाविद्यालयतील या विद्यार्थ्यांकडून यशस्वी रित्या पुर्ण करण्यात आला.

आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे संकल्पनेतून तयार झालेले हे कोकणातील एकमेव कृषि कौशल्य विकास केंद्र आहे.कृषि पदवीधरांना रोजगारक्षम व उद्योजक बनविण्याच्या दृष्टिकोनातून हे एक उत्तम प्रशिक्षण केंद्र म्हणून हे महाविद्यालय रत्नागिरी जिल्हयामध्ये नावारूपास येत आहे.या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य व कौशल्य विकास केंद्रप्रमुख डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक म्हणून प्रा.हरिश्चंद्र भागडे,प्रा.संग्राम ढेरे व प्रा.प्रणय ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशिक्षण समन्वयक म्हणून प्रा.प्रसाद साळुंके व नागेश सितारे यांनी काम पाहीले.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...