अंजनवेल येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंजनवेल येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न

अंजनवेल येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न

 गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग व बेटस्तरीय क्रीडा समिती आयोजित अंजनवेल साखरे बुद्रुक पाठ पडणारे व गुहागर या केंद्राच्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे अत्यंत उत्साह पूर्ण व दिमाखदार वातावरणामध्ये संपन्न झाल्या.क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अंजनवेलच्या सरपंच सोनल मोरे मॅडम यांचे शुभहस्ते करण्यात आले.क्रीडा स्पर्धा बीट विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या.त्यावेळी बीट विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे ,माजी सरपंच यशवंत बाईत ,केंद्रप्रमुख आरोही शिगवण, किरण सूर्यवंशी, निलेश पाटील ,ग्रामपंचायत सदस्य अ समद आचरेकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नदीम काकडे ,अध्यक्ष श्री विजय मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य फौजीया पठाण ,ग्रामपंचायत सदस्य वहिदा खतीब, जमातुल मुस्लिम बागमहोल्याचे अध्यक्ष अहमद वालपकर, शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, उर्दू संघटनेचे अध्यक्ष साजिद मुकादम, अखिल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील, समितीचे तालुकाध्यक्ष, बेलेकर सर ,जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अमोल धुमाळ, मुख्याध्यापक ईश्वर वसावे ,सुभाष गमरे ,राजेंद्र वानरकर अश्फाक कारभारी, इसाक कारभारी, मोरेश्वर वायंगणकर ,समीर धामणसकर ,समीर बामणे ,नदीम कोतवडेकर ,निलेश खामकर, सुनील वरेकर ,निळकंठ पावसकर, दिनेश जानवळकर, राजू सुर्वे ,संजय आवटे, गणपत निंबरे, तुकाराम नांदगावकर ,रमेश शिंदे ,संजना पवार प्रभागातील सरपंच ,उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी ,विद्यार्थी उपस्थित होते .त्यावेळी बोलताना बीट विस्ताराधिकारी नामदेव लोहकरे साहेब म्हणाले की सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास्तव्य करत असतं .विद्यार्थ्यांच्या अंगी चपळता ,नेतृत्व क्षमता हे गुण विकसित होतात .या लाल मातीतून भावी चांगले खेळाडू निर्माण होतील, विद्यार्थ्यांनी नियमाचे पालन करून खिलाडी वृत्ती दाखवून आपला खेळ मैदानावर दाखवावा व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित करावे असे त्यांनी प्रतिपादन केले .त्यावेळी लहान गट मोठे गट , मुलगे, मुली यांचे कबड्डी, लंगडी ,खो खो, क्रिकेट, लांब उडी ,उंच उडी ,धावणे ,थाळीफेक ,गोळा फेक इत्यादी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.त्यावेळी गुणवंत स्पर्धकांची निवड करण्यात आली व तालुकास्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली संपूर्ण स्पर्धेसाठी सर्व बक्षीस व मैदान ग्रामपंचायती अंजनवेल यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच सोनल मोरे मॅडम व इतर देणगीदार यांचा यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आपण बीट विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू हंबर्डे व महेश आंधळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीट गुहागर मधील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam