दलित साहित्यातील साचलेपण ‘ आंबेडकरी आई’ या पुस्तकाने दूर केला -डॉ. भालचंद्र मुणगेकर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दलित साहित्यातील साचलेपण ‘ आंबेडकरी आई’ या पुस्तकाने दूर केला -डॉ. भालचंद्र मुणगेकर

‘ आंबेडकरी आई’ या लेखनग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

नवी मुंबई (मंगेश जाधव)

आंबेडकरी स्त्री संघटन आयोजित नुकताच ‘ आंबेडकरी आई’ या लेखनग्रंथाचा प्रकाशन सोहळा दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात संपन्न झाला. प्रा. आशालता कांबळे, डॉ. श्यामल गरुड यांनी संपादित केलेला हा ग्रंथ डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यासमंडळाने प्रकाशित केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या स्त्रिया स्वत: कशा जगल्या आणि आपल्या मुलांना कसं घडवलं याचा पट ४२ लेकींनी या ग्रंथात मांडला आहे. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी भूषविले. त्याच बरोबर प्रमुख वक्ते डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. अजित मगदुम हे उपस्थित होते.

सदर वेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आंबेडकरी आईत आत्ममग्नता नाही, असे सांगून दलित सहित्याचे हे पुढचे स्थित्यंतर आहे असा गौरव केला. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ग्रंथांचा संदर्भ देत या ग्रंथाचे समाजशास्त्रीय विश्लेषण केले. दलित साहित्यातील साचलेपण या पुस्तकाने दूर केले आहे, असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.

डॉ. अजित मगदुम आपल्या संबोधनात म्हणाले, आईविषयी लिहायचं म्हटलं की भावनिकता येते. पण हे लेखन भावनिकतेने लिहिलेले नसून तटस्थपणे वास्तव मांडणी केली आहे. हे केवळ स्मृतीरंजन नाही. जे घडले आहे ते या सर्व लेकींनी या ग्रंथात मांडलं आहे. या आंबेडकरी आईंनी आपल्या नैतिक विचारातून, व्यावहारिक शहाणपणातून सामाजिक चारित्र्याचा वस्तुपाठ ठेवला आहे व तो सर्व समाजाला दिशादर्शक ठरेल. डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी आमच्यासाठी शिक्षण म्हणजे अक्षर ओळख नव्हे. गुलामीला उत्तर देण्याची सुरुवात शिक्षणाने होते. याचे भान असणाऱ्या या आई आहेत, असे प्रतिपादन केले.

 

डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, या ग्रंथात दिसणारी आईचं मातृत्व हे जैविक मातृत्वापासून सामाजिक मातृत्वापर्यंत सामावलेलं आहे. हे फक्त आईचं चरित्र नसून ते आजी, पणजीचं चरित्र आहे. आंबेडकरी आई या नावातच संघर्षाचा पट आहे. तसेच या आईंनी आपल्या लेकींना जीवनाचे सत्व, तत्व दिले त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणावर मात करायला शिकवले आहे. आंबेडकरी आईचा प्रवास हा मनुस्मृतीपासून संविधानसंस्कृती पर्यंतचा आहे.

 

यावेळी ग्रंथाच्या संपादिका प्रा. आशालता कांबळे यांनी या ग्रंथाची संकल्पना मांडली. नंदा कांबळे आणि सुरेखा पैठणे यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच प्रणेश वालावलकर यांनी रेखाटलेले प्रत्येक आईचे रेखाचित्र पडद्यावर दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला पुस्तकात वर्णन केलेल्या अनेक आईंनी उपस्थिती लावली होती. यात उर्मिला पवार, हिराताई बनसोडे, हिराताई पवार याही उपस्थित होत्या. याशिवाय ज्योती म्हापसेकर, ज. वि, पवार, सुरज येंगडे, पत्रकार आणि विचारवंत सुनील खोबरागडे, कवी विवेक मोरे, शाहीर राजेश शिर्के, डॉ. श्रीधर पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी दीक्षा शिर्के आणि वैभवी अडसूळ यांनी आपल्या गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. शेवटी उपस्थतित मान्यवरच्या आभार प्रदशनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam