प्रकल्पस्थळी वायू प्रदूषण नियंत्रण नियमाचे उल्लंघन केल्यास २० लाखांपर्यंतचा दंड, एमएमआरडीएचा निर्णय, कठोर कारवाई होणार!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकल्पस्थळी वायू प्रदूषण नियंत्रण नियमाचे उल्लंघन केल्यास २० लाखांपर्यंतचा दंड, एमएमआरडीएचा निर्णय, कठोर कारवाई होणार!

मुंबई – मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत असून हवेचा दर्जा खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. वायू प्रदुषणाला पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि बांधकाम प्रकल्प कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता अखेर पायाभूत सुविधा विकास प्रकल्पस्थळावरील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुढाकार घेतला आहे. त्यानुसार एमएमआरडीएकडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे.*

एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळी या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदाराला ५ लाखांपासून २० लाखांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे.

वायू प्रदूषणाची गंभीर समस्या लक्षात घेता एमएमआरडीएने बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. त्यानुसार आता एमएमआरडीएच्या प्रत्येक प्रकल्पस्थळावर आणि तेथील कामांवर नजर ठेवली जाणार आहे. प्रकल्पस्थळावरील राडारोड्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात आहे का, प्रकल्पस्थळावरील वाहनांची वाहतूक नियमांनुसार केली जात आहे का, साफसफाई ठेवली जात आहे का अशा अनेक बाबींची तपासणी नियमितपणे केली जाणार आहे. एमएमआरडीएच्या नियमावलीचे उल्लंघन करत वायू प्रदुषण करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी दंडात्मक कारवाईचा पर्याय एमएमआरडीएने निवडला आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदाराला ५ लाखांपासून ते २० लाखांपर्यंतचा दंड आकारला जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

एमएमआरचा विकास करताना पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष देण्यात येणार आहे. पुढच्या पिढीसाठी आरोग्यदायी वातावरण देण्यास आमचे सरकार वचनबद्ध असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणे हा आपणा सर्वांचा प्राधान्यक्रम आहे. बांधकामामुळे होणारे वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एमएमआरडीएने हाती घेतलेल्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. हवेची गुणवत्ता सुधारणे आणि ती अबाधित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आमच्या प्रकल्पातील सर्व कंत्राटदारांनीही आता आपली जबाबदारी ओळखत स्वच्छ आणि प्रदुषणविरहीत मुंबईसाठी योगदान द्यावे, असे आवाहन महानगर आयुक्त डाॅ संजय मुखर्जी यांनी केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam