पुण्यात नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावरील पोलिस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू; बंदोबस्तावरून घरी जाताना काळाचा घाला

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

पुण्यात नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावरील पोलिस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू; बंदोबस्तावरून घरी जाताना काळाचा घाला*

 

पुणे–  पुणे 2024 ला अलविदा करुन 2025 वर्षाचे स्वागत संपूर्ण देशभर जल्लोषात करण्यात येत आहे. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये मन हेलावणारी एक घटना घडली आहे. महाळुंगे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा ड्युटी आटोपून घरी जात असताना अपघाती मृत्यू झाला आहे. चोख बंदोबस्त बजावल्यानंतर ते घरी परतण्यासाठी निघाले असता त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार यांचा रात्रपाळी करून घरी जात असताना अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने पाठीमागून एका कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. गिरनार हे वाकड पोलीस स्टेशनला काम करत होते. मात्र त्यांची बदली महाळुंगे पोलीस स्टेशनला झाली होती. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार हे नववर्षाच्या स्वागतावेळी कुठलीही दुर्घटना घडू नये, म्हणून चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. ते कारमधून निघाले असताना समोरुन उजव्या बाजुने निघालेला कंटेनर अचानक डाव्या बाजूला शिरला. त्यामुळे डाव्या बाजूने चाललेल्या गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोरात धडक बसली.

 

पुढच्या सीटवर बसलेल्या गिरनार यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अचानक झालेल्या या घटनेने पिंपरी चिंचवड पोलिस दलावर शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नववर्षाच्या पहिल्याचा दिवशी अशी दुःखद घटना समोर आल्याने सर्वांचा धक्का बसला आहे. जितेंद्र गिरनार हे आपल्या कर्तव्यावर असताना ही घटना घडली आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा गिरनार यांचा स्वभाव होता. मात्र अचानक ही घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई