वाटद जि.प गटात मनसेची जम्बो कार्यकारिणी जाहीर. आगामी निवडणूकांची तयारीत मनसेची आघाडी.

वाटद जि.प गटात मनसेची जम्बो कार्यकारिणी जाहीर. आगामी निवडणूकांची तयारीत मनसेची आघाडी.

 

रत्नागिरी खंडाळा प्रतिनिधी :- निलेश रहाटे

वाटद जि.प गटात मनसे कडून उपतालुकाध्यक्ष ते गटाध्यक्ष पर्यंत नियुक्ती करून आगामी जि.प, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणूकी त ताकतीने उतरण्याचे संकेत मनसे नी दिले आहेत. व राज ठाकरेंच्या पाठीशी ठाम पणे उभे रहाणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रमुख पदावर नियुक्ती करून जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर उपाजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर व तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आगामी निवडणूक किती गांभीर्याने घेतल्या आहेत हे दाखवून दिले आहे.

व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते आजही पक्षाच्या व राज ठाकरेंच्या पाठीशी ठाम पणे उभे आहेत हे सिद्ध झाले आहे.

आगामी काळात अजून काही प्रवेश व नवनियुक्ती करून पक्ष अजून बळकट करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर यांनी कळविले आहे.

रत्नागिरी तालुका मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष पदी सत्यविजय खाडे तसेच मनसेच्या वाटद जि.प साठी उपतालुकाध्यक्ष पदी किशोर कुळये, विभागअध्यक्ष पदी संदीप बलेकर व लतेश सागवेकर, उपविभाग अध्यक्ष पदी पंकज गोताड व प्रसाद गुरव, शाखाध्यक्ष पदी अरविंद काताळे व राजेश कासार,किरण बोलें,उपशाखाध्यक्ष पदी नागेश रामाणे व तुषार बैकर इत्यादीची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी 2 दिवसांत उर्वरित पदावर नियुक्ती होणार आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालडकर तालुकाध्यक्ष सचिन शिंदे कामगार सेना जिल्हाचिटणीस महेंद्र गुळेकर व सर्व नवनियुक्त पदाधिकारी सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें