शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या व कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबराची गुहागर तालुक्यातील आबलोली येथे सांगता
आबलोली (संदेश कदम)
चिपळूण तालुक्यातील खरवते – दहिवली येथील शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय यांचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन दि. २३ डिसें.२०२४ ते २८ डिसें.२०२४ दरम्यान गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आयोजित करण्यात आले होते.सदर श्रमसंस्कार शिबिर कार्यक्रमाची सांगता नवीन शैक्षणिक संकुल,गोणबरेवाडी येथे मान.प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील,आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके,ग्रामविकास अधिकारी श्री.बाबूराव सुर्यवंशी,राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेतकरी श्री.सचिन कारेकर, श्री.कुदळे,प्रा.सुहास अडनाईक,प्रा.सुशांत कदम,प्रा.अश्विनी लालगे,श्री.अक्षय सुर्वे यांचे उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी गावातील श्रमदान,व इतर श्रमसंस्कार कार्यक्रम निमित्त आपले अनुभव स्वयंसेवक विद्यार्थी यांनी व्यक्त केले.याप्रसंगी मा.प्राचार्य डॉ.सुनीतकुमार पाटील यांनी राष्ट्र उभारणीसाठी युवांचे योगदान विषयक मार्गदर्शन केले.यानिमित्त शिबिरार्थी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत अधिकारी श्री.बाबूराव सूर्यवंशी यांनी ग्राम सर्वेक्षण,ग्राम स्वछता,बंधारे,शोष खड्डे व घनकचरा व्यवस्थापन पर विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या संपूर्ण श्रमसंस्कार निवासी शिबिरामध्ये प्रा.अमोल पवार यांचे व्यक्तिमत्व विकास,श्री.सचिन कारेकर यांचे वनौषधी विषयक,व श्री.विकास डीके यांचे भारतीय संविधाना पुढील आव्हाने या प्रबोधनपर विविध व्याख्यानांचे आयोजन देखील करण्यात आले.या निवासी शिबिराचे यशस्वी आयोजनाबाबत रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.महेश घाणेकर यांनी प्राचार्य, ग्रामपंचायत आबलोलीचे सर्व सदस्य,माजी सभापती व शिक्षण महर्षी श्री.चंद्रकांतशेठ बाईत, लोकशिक्षण मंडळ आबलोलीचेअध्यक्षश्री.सचिनशेठ बाईत कार्याध्यक्ष श्री.अविनाश कदम,मुख्याध्यापक श्री.डि.डी.गिरी ,योगेश भोसले तसेच व्यापारी,पत्रकार व ग्रामस्थ यांचे आभार मानले.स्वयंसेवक विद्यार्थी कु.विजय रुपनवर याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.