तळवली रिक्षा चालक-मालक संघटनेची भव्य रॅली
नववर्षाच्या प्रारंभी विविध कार्यक्रमांचे आयोजन
गुहागर (आशिष कर्देकर प्रतिनिधी)
तालुक्यातील तळवली येथील रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने नववर्षाच्या प्रारंभी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातून भव्य रॅलीदेखील काढण्यात आली.
गुहागर तालुक्यातील तळवली रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने दरवर्षी नवीन वर्षाच्या प्रारंभी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यावेळी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे अयोजनही केले जाते.या संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम देखील राबविले जातात.यावर्षी संघटनेच्यावतीने सकाळी सत्यनारायण महापूजा,दुपारी महाआरती,सायंकाळी 4 वाजता गावातून भव्य रिक्षा रॅली, सायं.7 वाजता हरिपाठ व रात्री 10.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रेकॉर्ड डान्सचे आयोजन करण्यात आले.यावेळी सर्व तळवली रिक्षा चालक-मालक संघटनेचे सभासद सहभागी झाले होते.