गुरव प्रीमियर लीग पर्व 4 स्पर्धेत गावदेवी कालिका माता संघ विजेता तर देवांश 11उपविजेता

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुरव प्रीमियर लीग पर्व 4 स्पर्धेत गावदेवी कालिका माता संघ विजेता तर देवांश 11उपविजेता

नवी मुंबई प्रतिनिधी (मंगेश जाधव)

गुहागर तालुक्यातील हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज गुहागर तालुक्याच्या टेनिस क्रिकेट स्पर्धा नुकत्याच तळवली श्री सिद्धिविनायक क्रिडांगण येथे पार पडल्या

या स्पर्धेत एकूण 12 संघांनी भाग घेतला होता संघमालक संजय गुरव, नरेंद्र चव्हाण, आनंदी गुरव, प्रकाश चव्हाण, समीर मोरे, सुभाष व दिपक आरवलकर, राजेंद्र गुरव, भूपेंद्र गुरव, प्रांजली गुरव, कल्पेश आरोलकर, संजय व विराज गुरव व कोमल गुरव हे होते समाजातील 178 खेळाडू सहभागी झाले होते सदरच्या स्पर्धा साखळी पद्धतीने दोन दिवस खेळविण्यात आल्या या स्पर्धेसाठी प्रथम व द्वितीय रोख बक्षीस समाजाच्या वतीने 15000/- व 10000/- देण्यात आले तसेच प्रथम व द्वितीय चषक सौ निशा राजेंद्र गुरव, मालिकावीर मार्लेश्वर दत्त बोट नाखवा समीर पिंपरकर व योगीराज बावकर, फलंदाज श्री महेश गुरव , गोलंदाज सौ शिल्पा गुरव , प्रत्येक सामना सामनावीर मेडल sps पिंपरकर परिवार, सन्मानचिन्ह श्री भैरी व्याघरंबरी मंडळ गुरववाडी, स्पर्धेसाठी चेंडू श्री शार्दूल अजित साळवी, मालिकावीर गोलंदाज व फलंदाज टीशर्ट श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स अजिंक्य गुरव यांच्याकडून देण्यात आले होते या स्पर्धेत

गावदेवी कालिकामाता याने प्रथम क्रमांक तर वेदांश 11या संघाने द्वितीय क्रमांक पटकवीला

मालिकावीर – सागर पवार, उत्कृष्ट फलंदाज भूषण गुरव व उत्कृष्ट गोलंदाज अभिजित गुरव यांना चषक व टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले

स्पर्धेत विशेष झटपट लकी ड्रॉ आदिती फूडगृह उद्योग सौ अपेक्षा संतोष पवार यांच्या मार्फत 16 आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली होती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तळवली गुरव समाज गटाच्या वतीने नियोजन करण्यात आले तसेच खेळाडू व हितचिंतक यांची जेवण व्यवस्था व राहण्याची व्यवस्था गटाकडून करण्यात आली होती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व गुरव समाज बंधूनी सहकार्य केले

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]