रत्नागिरी तालुक्यामध्ये शाळेमध्ये CCTV लावण्यात  दिरंगाई 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी तालुक्यामध्ये शाळेमध्ये CCTV लावण्यात  दिरंगाई 

 

रत्नागिरी खंडाळा प्रतिनिधी श्री निलेश रहाटे

 

रत्नागिरी – शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलिकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाबीची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात येत आहे. वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनासंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने, या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही. अस्तित्त्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांनी २१ऑगस्ट २०२४ रोजी सर्व शाळांमध्ये CCTV कॅमेरा लावण्यात यावे व त्याची नियमानुसार अंमलबजावणी करण्यात यावी असे शाळेय शिक्षण विभाग व इतर विभाग हयांना आदेश दिले होते. पण नेहमीप्रमाणेच नियम हे कागदावरच राहतात अशी परिस्थिती दिसण्यात येते माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख व पत्रकार श्री निलेश रहाटे यांनी याबाबत ऑगस्ट २०२४ रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती रत्नागिरी तालुक्यामध्ये सर्व शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याबाबत पत्रव्यवहार केला होता त्या अनुष्काने दि:- २९/१०/२४ गटशिक्षणाधिकारी रत्नागिरी हयांनी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये CCTV बाबत अंमलबजावणी चे आदेश दिले होते व त्याचा अहवाल अर्जदाराला परस्पर कळवण्यात यावे असे पत्रामध्ये नमूद केले होते. परंतु आज रत्नागिरी तालुक्यामध्ये याची लवकरात लवकर अंमलबजावणी होताना दिसत नाही फक्त *रा. भा. शिर्के प्रशाला शिवाजी नगर रत्नागिरी* ह्या शाळेचे अर्जदार ला पत्र प्राप्त झाले आहे. संबंधित शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांनी शाळेतील सुरक्षा बाबत महत्वाचे काढलेले परिपत्रक हे इतर शासन परिपत्रकानुसार कागदावरच राहणार आहे का ? किंवा एखादी मोठी अनुचित घटना घडल्यावर पुन्हा प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न अर्जदाराला व शाळेतील पालक वर्गाला पडला आहे.तरी शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे ह्यांनी शाळेतील मुलांच्या सुरक्षेबाबत लक्ष्य देणे गरजेचे आहे.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]