रखडलेली कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात डी. एड, बी. एड धारकांनी घेतली राज्यमंत्री ना. योगेश कदम यांची भेट.
रत्नागिरी ( वार्ताहर) जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागात आचार संहितेपूर्वी कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्या दरम्यान १०९ शिक्षकांना नियुक्ती पत्र दिले होते.. परंतु आचार संहितेमुळे पुढील नियुक्त्या झाल्या नव्हत्या.
आचार संहिता संपल्या नंतर पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत समुपदेशना प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
परंतु महिना होत आला तरी या शिक्षकांना नियुक्ती पत्र मिळाले नाही. त्यामुळे दापोली तालुक्यातील शिक्षकांनी घेतली ना. योगेश कदम यांची भेट..















