अंधेरी पूर्व येथील नालंदा बुद्ध विहारात पाच दिवसीय निवासी “बाल श्रामणेर शिबीर” संपन्न.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा झोन क्र. ३ यांच्या विद्यमाने आणि बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्र. १६० यांच्या सहकार्याने सहारगाव, अंधेरी पूर्व येथील नालंदा बुद्ध विहारात पाच दिवसीय निवासी “बाल श्रामणेर शिबीर” संपन्न.

अंधेरी पूर्व येथील नालंदा बुद्ध विहारात पाच दिवसीय निवासी “बाल श्रामणेर शिबीर” संपन्न.

नवी मुंबई (मंगेश जाधव)

सदर शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १८ बालकांनी सहभाग घेतला होता आणि या संघाचे संघ नायक भन्ते धम्मरत्न आणि भन्ते करुणानंद हे होते. या शिबिरासाठी झोन क्र. ३ मधील सर्व शाखांचे आणि स्थानिक रहिवाश्यांचे विशेष सहकार्य लाभले. आर्थिक सहकार्यांसह भोजनदान, अल्पोहारदान, पाणी दान, पुस्तके, वह्या, फळ आणि खीर अश्या विविध पद्धतीने दान करून कार्यक्रमासाठी उपासक उपासिका यांनी आपले सहकार्य दर्शविले. आंबेडकर नगर आणि सम्राट अशोक नगर या शाखेतील समता सैनिक दलातील सैनिकांनी सदर शिबिराच्या संरक्षणाची जबाबदारी अगदी काटेकोरपणे सांभाळली.
याकार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष – विलास वानखडे, सचिव – दयानंद बडेकर, झोन ३ चे विश्वास सावंत, राजेश भोसले, अरुण भोरकडे, शिवाजी डोंगरे, सोपान मादळे, शैलेश पवार, सुनील बोर्डे तसेच स्थानिक कार्यकर्ते संजय जाधव, संदिप जाधव, चंद्रकांत गायकवाड, नारायण जाधव, चंद्रकांत सावंत, विद्या पवार, विद्या कासारे, अनघा जाधव, सोनल कळंबे, के.डी. मोरे, रवी पवार, धम्मेश जाधव, विजय जाधव, अनिल जाधव, संतोष जाधव, विशाखा कांबळे, पूजा कांगे, बाळू शिंदे, भास्कर उघाडे, बाळू रंधवे यांची उपस्थिती लाभली. गौतम मुळे, सुरेश सावंत, सागर गायकवाड आणि स्वप्नील कळंबे यांचे सहकार्य लाभले. सदर शिबीर झोन क्र. ३ चे अध्यक्ष विनोद खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें