देवरुख आगाराचा गलथान कारभार!
देवरुख पुणे जाणारी एस टी बंद पडल्याने प्रवाशांचे हाल, देवरुख आगारा चा ढिसाळ कारभार प्रवासी् संतप्त
देवरुख – सविस्तर वृत्त असे कि
MH09EM9649 ही देवरूख पुणे सुटणारी एस टी बस चिपळूण जवळील कामथे घाटात बंद पडली व त्यामुळे नाहक आगाराच्या ढिसाळ कामा मुळे त्रास सहन करावा लागला
देवरुख आगारातून देखभाल केल्यानंतर सकाळी 08.00 सुटलेली बस एवढ्या कमी अंतरातच नादुरुस्त होते. अशी ही विचारणा आत्ता प्रवाशातून होत आहे., आगाराच्या गाड्यांचे
सतत नदुरिस्तीचे प्रमाण वाढत असल्याने तसेच प्रवाशांचे तक्रारी वाढत असतानाही देवरुख आगाराचा गलथान कारभार सुधारणार कधी? अशी प्रवाशांची प्रतिक्रिया येत आहेत.एकूण तीस प्रवाशी असून 10 लहान मुलांचा समावेश आहे.त्यांना खाण्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा अनेक बसेस असून ज्या बसेस आहेत त्या बसेस प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.अनेक बसेस चे सायलेन्सर खाली तोंड केल्याने रस्त्याची धूळ उडत असल्याने इतर वाहन धारकांना त्रास होत असून प्रदूषणास निमंत्रण देत आहेत.
बसेस प्रवाशांच्या नियमांनुसार नसून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नियमबाह्य बसेस पासिंग कशा करतात?
मुळात प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावर कारवाई करणे आवश्यक असून याबाबत 26 जानेवारी 25 रोजी काही प्रवाशी,सामाजिक कार्यकर्ते, महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आगार व्यवस्थापक यांच्या तसेच आर टी ओ अधिकारी यांच्या गैर कारभार विरोधात उपोषण करणार आहेत.















