दरपत्रक प्रदर्शित करणे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना बंधनकारक.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दरपत्रक प्रदर्शित करणे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना बंधनकारक.

रत्नागिरी– ( वार्ताहर) जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना व क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब यांनी महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारित) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, १४ जानेवारी २०२१ अनुसूची २ नुसार पुढील आजाराचा रुग्ण आढळून आल्यास/दाखल आल्यास त्याची परिपूर्ण माहिती कळविणे आवश्यक आहे. अनुसूची ३ नुसार शुश्रूषागृहात दरपत्रक दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.

स्थानिक पर्यवेक्षकीय अधिका-यांना अवगत करावयाच्या आजारांची/प्रकरणांची यादी- कॉलेरा (पटकी), प्लेग, घटसर्प, नवजात बालकांचा धनुर्वात, अॅक्युट प्लॅसीड पॅरालेसीस, जॅपनीस इप्सेफलायटिस, डेंग्यू, संसर्गजन्य कावीळ (इनफेक्टिव्ह हिपॅटिटीस), गॅस्ट्रएंटरायटीस, एच. आय. व्ही तपासणी रुग्ण संख्या, नकारात्मक रुग्णांची संख्या व सर्वसाधारण गरोदर माता मासिक तपासणी संख्या (एचआयव्ही), लेप्टोस्पायरोसीस, क्षयरोग (टीबी), गोवर, मलेरिया, चिकन गुनिया, गर्भाच्या लिंगासह एकूण गर्भपाताची संख्या (१६ ते २० आठवडयातील वैद्यकीय गर्भपात असल्यास), स्वाईन फ्ल्यू (एच १ एन १ इन्फूएंझा) शासन अधिसूचित करेल असे आजार.

अनुसूची ३ नुसार शुश्रूषागृहात पुढील दरपत्रक दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. प्रवेश शुल्क, प्रतिदिनी आंतररुग्ण दर (खाटा/अतिदक्षता कक्ष), वैद्य शुल्क (प्रतिभेट), सहाय्यक वैद्य शुल्क (प्रतिभेट), ५ भूल शुल्क (प्रतिभेट), शस्त्रक्रिया शुल्क, शस्त्रक्रिया सहाय्यक शुल्क, भूल सहाय्यक शुल्क (प्रतिभेट), शुश्रूषा शुल्क (प्रति दिन ), सलाईन व रक्त संक्रमण शुल्क, विशेष भेट शुल्क, मल्टीपॅरा मॉनिटर शुल्क, पॅथॉलॉजी शुल्क, ऑक्सिजन शुल्क, रेडियोलॉजी व सोनोग्राफी शुल्क. उपरोक्त प्रमाणे अनुसूची माहिती सादर न करणा-या खासगी व्यसायिकांवर साथरोग अधिनियम १८९७ नुसार व अनुसूची २ नुसार शुश्रुषागृहात दरपत्रक प्रदर्शित न करणा-या खासगी वैद्यकीय व्यसायिकांवर महाराष्ट्र शुश्रुषा नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारीत) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी यांनी कळविले आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका
Play sound